Urine Infection sakal
आरोग्य

Urine Infection: महिलांना वारंवार युरिन इन्फेक्शन का होते; ही घ्या कारणं अन्‌ उपाय

खासकरुन हा त्रास महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळालं.

Aishwarya Musale

उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र तरीदेखील उन्हाळ्यात जाणवणारा मूत्रमार्गाच्या जंतूसंसर्गाचा त्रास अद्यापही अनेकांना जाणवत आहे. साधारणपणे उन्हाळ्यात हा त्रास उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे जाणवत असतो. खासकरुन हा त्रास महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळालं. तुम्हालाही हा त्रास वारंवार होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.

मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाची लक्षणे -

१. मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे

२. सतत लघवीला होणे

३. मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे

४. दाह होणे

५.लघवीचा रंग गडद असणे

६. लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे

७. लघवीचा उग्र वास येणे

८.महिलांच्या ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात.

महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची कारणे -

१. जिवाणू व बुरशी ही योनीमार्गाचा संसर्ग होण्याची दोन प्रमुख कारणे.

२. योनी मार्गातील त्वचा कायम ओली राहणे.

३. योनी मार्गाची स्वच्छता न राखणे.

४. जंतुसंसर्ग असलेल्या साथीदारासोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जिवाणूजन्य संसर्गाचा धोका असतो.

UTI टाळण्यासाठी सोप्या टिप्स

लसूण खा

लसूण 1 लवंग मॅश करा आणि रिकाम्या पोटी खा. हे यूटीआयशी लढा देते आणि किडनीचे आरोग्य सुधारते. ताज्या लसणाच्या रसामध्ये ई. कोलाय बॅक्टेरियाची वाढ कमी करण्याची क्षमता असते. याशिवाय लसणात अॅलिसिन, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे यूटीआयची समस्या कमी होते.

आवळा खा

आवळ्याचा 1 छोटा तुकडा रिकाम्या पोटी खा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने ते बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. यामुळे शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे पोट आणि किडनी साफ होते आणि युरिन इन्फेक्शनची समस्या येत नाही.

नारळ पाणी

नारळाचे पाणी अँटी-बॅक्टेरियल असते, जे मूत्राशयातील बॅक्टेरिया साफ करण्यास मदत करते. नारळपाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि युरिन इन्फेक्शनलाही प्रतिबंध होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Conflict : अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला, इंधन दराचा भडका उडणार? कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

IND vs NZ 1st ODI: उद्या पहिला वन डे सामना अन् एक, दोन नव्हे, तर सहा खेळाडूंची माघार; दुखापतीच्या ग्रहणाने संघ अडचणीत, भारत...

Jaykumar Gore Victory : सातारा जिल्हा बँकेत पुन्हा एकदा 'जय हो'! माण सोसायटी मतदारसंघात जयकुमार गोरेंचा मोठा विजय; विरोधकांचा दारूण पराभव

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस-आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी

European Roller: मेळघाटच्या जंगलात युरोपियन पाहुणा;निळ्या पंखांच्या सौंदर्याने पक्षिप्रेमी भारावले, जैवविविधतेत भर

SCROLL FOR NEXT