pregnant woman esakal
आरोग्य

प्रेग्नेंसीमध्ये Vitamin D का महत्त्वाचे? कमतरतेमुळे वाढू शकतो धोका

प्रेग्नेंसीमध्ये व्हिटॅमिन डिच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान, धोका आणि फायद्याबाबज जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Importance of Vitamin D during Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये (Pregnancy) महिलांच्या शरिरामध्ये आरोग्यासाठी कित्येक पोषक तत्व, व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ गरजेचे असतात. जर आवश्यक व्हिटॅमिनच्या बाबतीत सांगायचे झाले तर, नेहमी महिला व्हिटॅमिन ए, सी युक्त पदार्थांचे सेवन करतात पण, व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांकडे दुर्लक्ष( Vitamin 'D' Deficiency in Pregnancy) करतात. गर्भावस्थेमध्ये व्हिटॅमिन्स डि तितकेच महत्त्वाचे असते जितके इतर व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व. व्हिटॅमिन डी रक्तामध्ये फॉस्फोरस आणि कॅल्शियमचे प्रमाण संतुलित ठेवते. हे कॅल्शिअम अॅब्जॉर्ब करते. व्हिटॅमिन डी हाडांची मजबूती, दातांचे आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.

जर तुम्ही प्रेग्नेंसीमध्ये हेल्दी आहार घेणार असाल तर व्हिटॅमिन डिची कमतरता शरीरात होऊ देऊ नका कारण व्हिटॅमिन डी इम्युनिटी वाढविण्याचे काम करते. चला जाणून घेऊ या प्रेग्नेंसीमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराला काय नुकसान, काय फायदे आणि काय फूड सोर्स आहेत. (Importance of Vitamin 'D' in Permanency)

प्रेग्नेंसीमध्ये 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता होण्याची कारणे

जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीटी कमरतरता झाल्यास, लवकरात लवकर शरीराला व्हिटॅमिन डी असलेल्या आहाराचे सेवन करा. व्हिटॅमिन डि च्या कमतरतेमुळे तुमच्या हाडं दुखणे किंवा थकवा येऊ शकतो. त्यामुळे बाळाच्या हाडांना मजबूती मिळणार नाही, व्हिटॅमिन डिच्या कमतरतेमुळे बाळाचे वजनावर परिणाम होऊ शकते. गर्भवती महिलांना बल्ड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. गर्भावस्थेमध्ये कोवळ्या उन्हामध्ये न बसणे, बाहेर जाणे कमी करणे, व्हिटॅमिन डि युक्त पदार्थांचे सेवन न करणे, स्किन पिग्मेंटेशन, सनस्क्रिनची वापर जास्त प्रमाणात केल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन डिची कमतरता होते.

प्रेग्नेंसीमध्ये 'व्हिटॅमीन डी'च्या कमतरतेमुळे वाढतो धोका

जर तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि शरीरामध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरता झाल्या तुम्हीला प्री- अॅक्लेमप्सिया, बॅक्टेरिअल व्हेजिनोसिस, जेस्टेशनल डायबिटीज, गर्भपात, पीर्टम लेबर, गर्भाशयातील भ्रृणाची वाढ नीट न होणे असे धोका होऊ शकते.

प्रेग्नेंसीमध्ये व्हि़टॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण

  • नेहमी हाडांमध्ये दुखणे

  • मसल्समध्ये दुखणे

  • थकवा जाणवणे.

  • अशक्तपणा जाणवणे.

  • मूड स्विंग, चिडचिड होणे

गर्भावस्थेमध्ये व्हिटॅमिन डीचे फायदे

  • प्रेग्नेंसीमध्ये 'व्हिटॅमीन डी' घेतल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे हाडे, मांस पेशी आणि दात मजबूत होतात आणि निरोगी राहतात.

  • शरीरामध्ये 'व्हिटॅमीन डी'ची कमतरता झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामुळे मधूमेह होण्याचा धोका वाढतो. 'व्हिटॅमिन डी'युक्त वस्तूंचे सेवन केल्याने मधूमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

  • व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवनामुळे प्री अॅक्लेमप्सिया म्हणजे उच्च रक्तदाब होण्याचा धोका कमी होऊ शकतो. हे प्रेग्नेंसीमध्ये २० व्या आठवड्यामध्ये बहुतांश महिलांमध्ये दिसून येणारे लक्षण आहे.

  • व्हिटॅमिन डीच्या सेवनामुळे बाळाचा विकास योग्य पध्दतीने होतो. वेळेच्या आधीच बाळाचा जन्म होण्याचा शक्यता कमी होते.

  • जर तुम्ही पुरेशा प्रमाणात व्हिटॅमीन डी युक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर सर्जरीद्वारे बाळाला जन्म देण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: “निवडणूक लढवता? मग हे लिहून द्याल का?” संकल्पनामा फेल झाला तर राजकारणालाही ब्रेक!

Malegaon News : तुकाराम मुंडेंच्या आदेशाला केराची टोपली; मान्यता रद्द असूनही मालेगावात अंधशाळा सुरूच

Union Budget 2026 : १ फेब्रुवारी रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहणार का?

मुस्ताफिजूर रहमानच्या हकालपट्टीचा राग बांगलादेशने भारतीय तरुणीवर काढला; ती म्हणाली, मला काही बोलायचे नाही, जय हिंद!

'अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही'; नीतेश राणेंचा स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT