Health tips 
आरोग्य

Health tips : 'ही' गोष्ट अती प्रमाणात खात असाल तर लवकरच व्हाल म्हातारे

अती गोड पदार्थ तूम्हाला वेळेआधीच म्हातारे बनवू शकते.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सवात रोजच्या आरतीनंतर प्रसाद काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. बाप्पाच्या प्रसादावर सगळेच तुटून पडतात. प्रसादाच्या नावाखाली अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्ले जातात. मात्र जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. अती गोड पदार्थ तूम्हाला वेळेआधीच म्हातारे बनवू शकते. आज आपण जास्त गोड खाल्ल्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणार आहोत.... (Why sugar is bad for health)

मधुमेहाला आमंत्रण

जास्त गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होतो. हे रक्तातील साखर वाढणे मेंदूसाठी हानिकारक असून मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ग्लुकोज पोहोचत नाही. त्यामूळे मेंदू नीट काम करू शकत नाही. परिणामी स्मरणशक्तीही कमी होते. 175 हून अधिक देशांतील लोकसंख्येच्या सर्वेमध्ये असे आढळून आले की, मधुमेह होण्याचा धोका दररोज सेवन केलेल्या 150 कॅलरी साखरेमूळे 1.1% वाढतो.

वृद्धत्वाचा धोका

प्रत्येकालाच तरूण दिसायला आवडते. त्यामूळे प्रत्येकजण काळजी घेताना दिसतो. पण, जास्त गोड खाण्याची सवय तुम्हाला वयाच्या आधी म्हातारे बनवू शकते. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात इंफ्लेमेटरी इफेक्ट निर्माण होतो, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, वृद्धत्व आणि सुरकुत्या या समस्या निर्माण होतात.

हृदयविकार होईल

जास्त साखर खाणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे हार्ट स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. गोडामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढते. या गोष्टी हाताबाहेर गेल्याने हृदयविकार वाढतो. 30,000 लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, साखरेमूळे ज्यांच्या 17-21% कॅलरी अतिरिक्त वाढल्या आहेत त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 38% अधिक आहे.

कॅन्सरचा धोका

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. साखरचे पदार्थ आणि पेय लठ्ठपणा वाढवतात, ज्यामुळे तुमचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. साखर आपल्या शरीरात सूज वाढवते. त्यामूळे इन्सुलिन प्रतिरोध देखील होऊ शकते, या दोन्हीमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. 4,30,000 हून अधिक लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, साखरेचे सेवन केल्याने अन्ननलिका, फुफ्फुस आणि लहान आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

लठ्ठपणा वाढतो

आज प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त आहे. ही सर्वात सामान्य परंतु गंभीर समस्या आहे. त्यामुळे अनेक आजार बळावतात. आपण जास्त साखर खाल्ल्यास आपले शरीर लिपोप्रोटीन लिपेज तयार करू लागते जे आपल्या पेशींमध्ये चरबी साठवते. अतिरीक्त चरबी साचून राहिल्याने वजन नियंत्रणात येत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

प्रतिकारशक्तीची गरज किती आहे हे कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे. त्यामूळे रोगप्रतिकारक शक्तीसाठी गोड खाणे चांगले नसते. गोड पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत बनवतात त्यामूळे तूम्ही लवकर आजारी पडू शकता.

फॅटी लिव्हरची समस्या

गोड खाणे यकृतासाठी धोक्याचे असते. त्यामुळे यकृतावर प्रभाव पडतो आणि शरीरात लिपिड्सची निर्मिती वाढते. त्यामुळे फॅटी लिव्हर डिसिज होण्याचा धोका असतो. 5,900 हून अधिक वृद्धांच्या सर्वेत असे दिसून आले आहे की, जे दररोज साखरयुक्त पेये घेतात त्यांना ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (एनएएफएलडी) होण्याचा धोका 56% जास्त असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain : कोल्हापूर विभागात ओला दुष्काळ! ऊस उत्पादनात ३५ ते ४० लाख टनांची घट होण्याची शक्यता

Satara : महिला डॉक्टर हॉटेलवर का गेली? मध्यरात्री दीड वाजता 'चेक इन', २ दिवसाचं बूकिंग; दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

Latest Marathi News Live Update : फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

Panvel News: मोलाचा जीव संकटात! कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना नोटिसा, अग्निशमन यंत्रणा बंद; नेमकं प्रकरण काय?

Turntable Ladder : ‘टर्नटेबल लॅडर’ म्हणजे काय? कागल उरुसात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दलाची शौर्यपूर्ण मोहीम

SCROLL FOR NEXT