Winter Health google
आरोग्य

Winter Health : थंडीत उद्भवणाऱ्या आजारांवर घरीच करा उपाय

बदलत्या वातावरणामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

नमिता धुरी

मुंबई : कधीकधी आपल्याकडे बोचरी थंडी पडते तर कधी दुपारी घामाच्या धारा लागतात. अशा बदलत्या वातावरणामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीमध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवरील घरगुती उपयांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Winter health tips)

हाडे दुखणे, स्नायू आक्रसणे : सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमध्ये काही वेळेला अनेक दिवस ऊन पडत नाही. अनेक दिवस ऊन न पडल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे दुखणे, स्नायू जखडणे अशा विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा आजारांपासून वाचण्यासाठी शक्यतो थंड हवेत घराच्या बाहेर निघू नका. तसेच ज्या पदार्थांमधून डी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळेल अशा पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

सर्दी, खोकला होणे : हवामानामध्ये बदल झाल्यास अनेकांना सर्दी तसेच खोकल्याची समस्या जाणवते. अशावेळी शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. तसेच सर्दी झाल्यास घरीच तुम्ही पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. सर्दीसाठी विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा काढा देखील रामबाण उपाय ठरतो.

श्वास घेण्याची समस्या : थंडीमध्ये जवळपास सर्वांनाच सर्दी सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. सर्दीमुळे कफ निर्माण होतो. कफ निर्माण झाल्यास श्वास घेण्यासाठी अडचण येते. श्वासनाची समस्या जाणवत असल्यास पिण्यासाठी गरम पाणी वापरावे, तसेच विविध पदार्थांचे गरम सूप प्यावे.

ब्लड प्रेशर संबंधित समस्या : थंडीमुळे रक्तदाब देखील कमी जास्त होऊ शकतो. ज्यांना आधीच रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी अशा वातावरणात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. रक्तदाबाच्या समस्येमुळे डोके दुखणे, हायपरटेंशन अशा विविध आजारांचा धोका असतो. अशा व्यक्तींनी थंडीच्या दिवसांमध्ये नियमितपणे लसणाचे तसेच मधाचे सेवन करावे. यामुळे धोका कमी होतो.

Disclaimer : हा लेख सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. तुम्हाला जर वरीलपैकी कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT