Beetroot Tea  esakal
आरोग्य

Beetroot Tea : मधुमेहींसाठी स्पेशल, गुलाबी थंडीत प्या हा मस्त मसालेदार चहा अन् बघा चमत्कार

चिंता करू नका हा चहा तुमचं शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये ठेवेल आणि तुम्हाला आरोग्यदायी अनेक फायदेही देईल

सकाळ ऑनलाईन टीम

Beetroot Tea : कडाक्याच्या थंडीत शरीराला ऊब देण्यासाठी सर्वप्रथम आठवतो तो चहा. मात्र मधुमेहींना गोड चहा पिणे महागात पडेल. एवढेच नव्हे तर शुगर लेव्हल वाढवणे आणि आजाराला आमंत्रण दिल्यासारखेही होईल. मात्र चिंता करू नका हा चहा तुमचं शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये ठेवेल आणि तुम्हाला आरोग्यदायी अनेक फायदेही देईल.

बीटरूट एक अतिशय आरोग्यदायी सुपरफूड आहे ज्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोह भरपूर आहे. बीटरूट खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. याशिवाय याच्या सेवनाने रक्तदाब आणि साखर नियंत्रणात राहते. त्याचा वापर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास देखील होते.

तसे, लोक बीटरूटचे सेवन सॅलेट, रस किंवा भाजी बनवून करतात. पण तुम्ही कधी बीटरूट चहा करून पाहिला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी बीटरूट चहा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. बीटचा चहा चविष्ट तसेच पौष्टिक आहे. तसेच बनवायला कमी वेळ लागतो, चला तर मग जाणून घेऊया बीटरूट चहाबद्दल.

बीटरूट चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

पाणी 1-1/2 कप

आसामी चहाची पाने 2 चमचे

वेलची ३

दालचिनी १/२

आले पावडर 1/4 टीस्पून

बीटरूट पावडर 1 टीस्पून

दूध 1/2 कप

चवीनुसार साखर (Winter)

बीटरूट चहा कसा बनवायचा?

बीटरूट चहा बनवण्यासाठी सर्व प्रथम एका पॅनमध्ये पाणी घाला.

नंतर त्यात चहाची पाने, वेलची, दालचिनी, आले आणि बीटरूट पावडर टाका.

यानंतर या सर्व गोष्टी एकत्र करून चांगले उकळा.

नंतर त्यात दूध घालून चांगले मिक्स करून उकळावे.

यानंतर चवीनुसार साखर घालून थोडा वेळ शिजवा. (Health Tips)

आता तुमचा पौष्टिक आणि स्वादिष्ट बीटरूट चहा तयार आहे.

नंतर एका कपमध्ये गाळून गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT