Children's Height esakal
आरोग्य

Children's Height : योग्य वयात मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांच्या आहाराबरोबरच या 2 गोष्टींची जोड महत्वाची

पोषक आहार आणि व्यायाम जेनेटिक्समध्ये महत्वाची भूमिका बजावतात

साक्षी राऊत

Children's Height : काही मुलांची वाढ ही झपाट्याने होते तर काही मुलांची वाढ मंद गतीने होत असते. ज्या घरातील आई-वडिलांची उंची कमी असते त्यांना कायम त्यांच्या मुलांच्या उंचीबाबत चिंता असते. योग्य वयात हवी तशी उंची वाढली नाही तर आपला मुलगा/मुलगी ठेंगणा तर होणार नाही ना याबाबत कायम पालकांना टेंशन असते. पोषक आहार आणि व्यायाम जेनेटिक्समध्ये महत्वाची भूमिका बजावतात. चला तर आज आपण या लेखामध्ये मुलांची उंची वाढण्यासाठी मुलांचे आनंदी राहणे, हेल्दी राहणे किती महत्वाचे आहे ते जाणून घेऊया.

मुलांचे भावनिक आरोग्य

स्काय न्यूजच्या लॉफबोरो युनिव्हर्सिटीमध्ये बायोलॉजिकल एथ्रोपॉलॉजिस्ट प्रोफेसर बॅरी बोगिन यांच्या मते, मुलांच्या भावनिक आरोग्याचा त्यांच्या उंचीवरही परिणाम होऊ शकतो. याबाबतचे विश्लेषण त्यांनी जर्नल ऑफ फिडियोलॉजिकल एंथ्रोपोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मानसिक आरोग्य, हार्मोन्स आणि तणाव

प्रोफेसर बोगिन यांच्या मते, ज्या मुलांना कुटुंबियांकडून पुरेसे प्रेम मिळत नाही किंवा ज्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांचा भावनात्मक स्ट्रेस वाढतो. ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावरही होतो. मुलांमधील वाढीव उंचीसाठी महत्वाचे हार्मोन्स या कारणाने ब्लॉक होण्याची शक्यता असते. तेव्हा मुलांची वाढ झपाट्याने होण्यासाठी त्यांना प्रेम, आशा आणि आनंदी राहण्याची गरज असते. जेणेकरून मुलांची योग्य वाढ योग्य वयात व्हावी. (Child Care Tips)

जेनेटिक्सचीही भूमिका महत्वाची

उंची वाढण्यासाठी जेनेटिक्स हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आई-वडिलांची उंची, फॅमिली हिस्ट्री आणि इथनिक बॅकग्राउंड हे घटक सुद्धा मुलांच्या उंचीत महत्वाची भूमिका बजावतात.

मुलांचे आनंदी असणे फार महत्वाचे

पालकांनी त्यांच्या मुलांसोबत क्वॉलिटी टाइम घालवावा. त्यांच्या सोबत खेळा किंवा त्यांच्या आवडत्या अॅक्टिव्हिटीज घ्या. जे करताना मुलांचा उत्साह वाढेल. आणि पालकांसोबतचे त्यांचे नाते मजबूत होईल. (Lifestyle)

घरातील वातावरण चांगले असावे

मुलांचे भावनिक आरोग्य घरातील वातावरणावर अवलंबून असते. पालकांनी घरातील वातावरण असे ठेवावे जेणेकरून ते तुमच्यापुढे मुक्तपणे व्यक्त होऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT