Mental Health Of Women  esakal
आरोग्य

Mental Health संबंधित समस्या असल्यास महिलांना जाणवतात ही लक्षणं, दूर्लक्ष कराल तर...

ज्याप्रकारे शारीरिक आरोग्य बिघडल्यास तुम्हाला लक्षणं जाणवतात त्याचप्रमाणे तुमचं मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचीसुद्धा काही लक्षणे दिसू लागतात

सकाळ डिजिटल टीम

Mental Health Of Women : महिला घराची आणि ऑफिसची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडतात. घरी मुले, पती यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभवत ऑफिस वर्कलोडही हँडल करतात. मात्र हे सगळं करत असताना नकळत त्यांचं स्वत:कडे दूर्लक्ष होतं आणि त्यांचा मानसिक त्रास वाढायला सुरुवात होते. ज्याप्रकारे शारीरिक आरोग्य बिघडल्यास तुम्हाला लक्षणं जाणवतात त्याचप्रमाणे तुमचं मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचीसुद्धा काही लक्षणे दिसू लागतात. मात्र त्याकडे दूर्लक्ष केल्यास भविष्यत तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

महिलांना मानसिक समस्या असल्यास ही लक्षणं दिसू लागतात

१. कामात लक्ष न लागणे

कुठल्याही कामात लक्ष न लागणे हे मानसिक आरोग्याचं गंभीर लक्षण असू शकतं. या स्थितीत महिलांना त्यांच्या कामावर फोकस करता येत नाही. उदा. ऑफिसमध्ये काम योग्य प्रकारे न करू शकणे, मुलांवर लक्ष केंद्रित न करता येणे. याशिवाय किचनमधील कामांत उलथापालथ होणे हेसुद्धा मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं.

Mental Health Of Women

२. वस्तू ठेवून विसरून जाणे

अनेकदा महिला वस्तू एका जागी ठेवून विसरून जातात. अनेकदा हे सामान्य असतं. मात्र हे वारंवार होत असेल तर ते मानसिक आरोग्य व्यवस्थित नसल्याचे संकेत देत असतात. तेव्हा याकडे दूर्लक्ष करता कामा नये.

३. आनंद न होणे

एखादी महिला काम करून दु:खी असेल तसेच तिला कुठल्याच कामात रस नसेल तर ते मानसिक आजाराचं लक्षण ठरू शकतं. जे काम आधी करण्यात तुम्हाला फार रस वाटायचा पण आता मात्र आनंद वाटत नाही यातून स्पष्ट दिसून येतं की तुम्ही मानसिकरित्या तणावात आहात.

४. झोप न येणे

रात्री झोप न येणं हे मानसिक आरोग्याचं लक्षण असू शकतं. तसेच तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयींमध्ये बदल होत असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका. तुम्हाला रात्री उशीरापर्यंत झोप येत नसेल आणि सकाळी उशीरापर्यंत झोपत असाल तर ते मानसिक समस्येचं लक्षण ठरू शकतं.

५. जास्त किंवा कमी भूक लागणे

कमी भूक लागणे किंवा फारच भूक लागणे हे मानसिक आजाराचं लक्षण ठरू शकतं. तुम्हाला वारंवार भूक लागत असेल किंवा फार भूक लागत असेल तर डॉक्टरांना एकदा दाखवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Sunil Tatkare : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी 'महायुती'ला साथ द्या; सुनील तटकरेंचे नाशिककरांना आवाहन

SCROLL FOR NEXT