World Brain Tumor Day 2024 esakal
आरोग्य

World Brain Tumor Day 2024 : ब्रेन ट्युमर हा आजार काय आहे? मेंदूतील ट्युमरची लक्षणे घ्या जाणून

World Brain Tumor Day 2024 : मागील काही वर्षांपासून जगभरात ब्रेन ट्युमरच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

World Brain Tumor Day 2024 : मागील काही वर्षांपासून जगभरात ब्रेन ट्युमरच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा एक मेंदूचा गंभीर आणि घातक आजार आहे. या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ जून हा दिवस ‘जागतिक ब्रेन ट्युमर दिन’ म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस सर्वप्रथम जर्मन ब्रेन ट्युमर असोसिएशनने सन २००० मध्ये साजरा केला होता, तेव्हापासून आजतागायत हा दिवस सगळीकडे साजरा केला जातो. हा आजार लहान मुले आणि प्रौढांना प्रभावित करू शकतो.

तज्ज्ञांच्या मते ब्रेन ट्युमर हा असा आजार आहे की, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात. हा आजार जितक्या लवकर ओळखला जाईल तितके चांगले असेल. कारण, या आजारावर वेळीच उपचार न केल्यास हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. आज या जागतिक ब्रेन ट्युमर दिनानिमित्त आपण ब्रेन ट्युमर म्हणजे काय? आणि त्याची लक्षणे काय आहेत? ते जाणून घेणार आहोत.

ब्रेन ट्युमर हा आजार नेमका काय आहे?

ब्रेन ट्युमर हा आजार मेंदूमध्ये होतो. मेंदूमध्ये असामान्य पेशी जमा झाल्यामुळे हा आजार होतो. हा आजार कर्करोगजन्य किंवा कर्करोग नसलेला ही असू शकतो. ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामध्ये मेंदूमध्ये गाठी तयार होतात. या गाठी काही प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात तर काही प्रकरणांमध्ये हळूहळू वाढतात.

महत्वाची बाब म्हणजे केवळ एक तृतीयांश ट्युमर हे कर्करोगाचे असतात. ब्रेन ट्युमर झाल्यास तो व्यक्तीच्या मेंदूच्या कार्यावर आणि तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो.

मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या ट्युमरला प्राथमिक ट्युमर असे म्हटले जाते. तसेच, जर हा ट्युमर तुमच्या शरीराच्या वेगळ्या भागात तयार झाल्यानंतर जर तो मेंदूमध्ये पसरू लागला तर त्या ट्युमरला दुय्यम किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्युमर असे म्हटले जाते.

ब्रेन ट्युमरची लक्षणे कोणती?

ब्रेन ट्युमरची लक्षणे ही ट्युमरचे स्थान, आकार आणि प्रकार यावर अवलंबून असतात. ब्रेन ट्यूमरची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

  • व्यक्तीची दृष्टी कमी होते.

  • सकाळी किंवा रात्री सतत तीव्र डोकेदुखी जाणवणे.

  • ऐकण्यात अडचणी निर्माण होणे.

  • उलट्या किंवा मळमळीचा सतत त्रास होणे.

  • शरीराच्या ठराविक भागात कमजोरपणा येणे.

  • व्यक्ती तिचे संतुलन गमावते किंवा व्यक्तीला सतत चक्कर येणे.

  • भास आणि दिशाभूल करणारी परिस्थिती निर्माण होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT