World Brain Tumor Day 2024  esakal
आरोग्य

World Brain Tumor Day 2024 : ‘या’ योगासनांचा दररोज सराव केल्याने ब्रेन ट्युमरचा धोका कमी होऊ शकतो, जाणून घ्या पद्धत

World Brain Tumor Day 2024 : ब्रेन ट्युमर या आजारामध्ये मेंदूच्या ठराविक भागात असामान्य पेशी मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्यामुळे, याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर आणि आरोग्यावर होतो.

Monika Lonkar –Kumbhar

World Brain Tumor Day 2024 : आज जगभरात जागतिक ब्रेन ट्युमर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा मेंदूचा अतिशय गंभीर आजार आहे. या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

ब्रेन ट्युमर या आजारामध्ये मेंदूच्या ठराविक भागात असामान्य पेशी मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्यामुळे, याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर आणि आरोग्यावर होतो.

ब्रेन ट्युमरच्या सामान्य लक्षणांबद्दल सांगायचे झाल्यास, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, मळमळ होणे, दृष्टी कमजोर होणे, ऐकण्याची समस्या निर्माण होणे आणि बोलण्यात अडचण येणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

आज सर्वत्र जागतिक ब्रेन ट्युमर दिन साजरा केला जात आहे. मन आणि शरीर या दोघांच्याही आरोग्यासाठी योगासन फायदेशीर आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी काही योगासने प्रभावी ठरतात. मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे या योगासनांचा सराव करू शकता. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

ताडासन

ताडासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित सरावाने शरीराचे स्नायू लवचिक होतात. या आसनाचा सराव केल्याने फुफ्फुसांचा विस्तार होतो. यासोबतच हे योगासन केल्याने एक्रागता वाढते आणि श्वासोच्छवास संतुलित राहतो.

ताडासन करण्याची योग्य पद्धत

  • ताडासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा.

  • या स्थितीमध्ये तुमची कंबर आणि मान सरळ राहील याची काळजी घ्या.

  • आता तुमचे दोन्ही हात वर करा आणि हळूहळू श्वास घ्या. काही सेकंद या स्थितीमध्ये राहा.

  • त्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये या.

वज्रासन

हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी आणि मानसिक-शारिरीक आरोग्यासाठी तुम्ही वज्रासनाचा सराव करू शकता. या आसनामुळे तणावाचे संप्रेरक कमी होते आणि तणाव दूर होण्यास मदत होते. वज्रासन केल्याने पचनसंस्थाही निरोगी रागते. तसेच, पाठ आणि मानेला आराम मिळतो. थोडक्यात वज्रासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

वज्रासन करण्याची योग्य पद्धत

  • वज्रासन या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पाय जमिनीवर पसरून सरळ बसा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही हात नितंबाच्या जवळ जमिनीवर ठेवा.

  • यावेळी तुमचे संपूर्ण वजन हातावर पडणार नाही याची काळजी घ्या.

  • त्यानंतर, सर्वात आधी तुमचा उजवा आणि नंतर डावा पाय वाकवून नितंबाच्या खाली घ्या.

  • त्यानंतर दोन्ही मांड्या आणि पायाची बोटे जोडून घ्या. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT