World Fertility Day sakal
आरोग्य

World Fertility Day 2022: मूल न होण्यात दोष नक्की कोणाचा ; जाणून घ्या वंधत्वाशी संबंधित पाच गैरसमज!

सकाळ डिजिटल टीम

Myths And Truths About Infertility : प्रत्येक जोडप्याला वाटते, की आपले स्वतःचे एकतरी मूल असावे. पण प्रत्येक जोडप्यास निसर्गतः स्वतःचे मूल होईलच असे नाही. गेल्या दोन दशकांमध्ये वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. असे असले तरी मूल न होण्यात त्या स्त्रीचाच दोष आहे असे मानले जाते. त्यावरून तिचा टॉर्चर करणे, समारंभात तिचा अपमान करणे हे असे प्रकार आजही होतात. त्यामुळेच आज (2 नोव्हेंबर) जागतिक प्रजनन दिन जगभरात साजरा केला जातो. हा विशेष दिवस वंध्यत्व आणि प्रजनन संबंधी समस्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

पुरूषांना स्वत:च्या वंधत्वा लाज वाटते त्यामुळे ते स्त्रीला दोष देऊन मोकळे होतात. या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. याविषयी कोणाशी चर्चा न केल्याने त्यावर योग्य तो उपचार होत नाहीत. अशावेळी परिस्थितीत वंध्यत्वाशी संबंधित काही गैरसमजूती लोकांच्या मनावर परिणाम करू लागतात. वंध्यत्व ही एक सामान्य समस्या आहे आणि ती शारीरिक, सामाजिक आणि मानसिक कारणांमुळे असू शकते याची जाणीव असणे आवश्यक आहे. वंध्यत्वाशी संबंधित अनेक गैरसमजूती आहेत.

एखादे दांपत्य अपत्यहीन असण्याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे गर्भधारणा न होणे किंवा वारंवार गर्भपात होणे. यांपैकी गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात. त्यामुळे आज जाणून घेऊयात वंधत्वाशी निगडीत काही समजूती.

वंध्यत्व हा प्रामुख्याने स्त्रियांचा दोष आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, वंध्यत्वाच्या केसेसमध्ये एक तृतीयांश प्रकरणे ही पुरुषांमधील प्रजनन समस्यांमुळे होतात. तर, एक तृतीयांश प्रॉब्लेम्स हे स्त्रियांमधील शारिरीक अडचणींमुळे होतात. तर, इतर केसेसमध्ये दोष कोणाच्यातही नसतो पण नेमके कारण समजू न शकल्याने मूल राहण्यास अडचणी निर्णाण होतात. त्यामुळे वंध्यत्व ही स्त्रीची समस्या नसून स्त्री आणि पुरुष दोघांची समस्या असू शकते.

35 वर्षांपेक्षा जास्त वयाची स्त्री आई होऊ शकत नाही.

ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. शास्त्रानूसार स्त्रियांचा पुनरुत्पादक कालावधी वयात आल्यापासून सुरू होतो आणि वयाच्या तीसव्या वर्षापर्यंत टिकतो. तरीही अनेक स्त्रिया त्यानंतर निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. त्यामुळे ही समजूतही खोटी मानावी लागेल.

सतत गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याने वंध्यत्व येऊ शकते.

गर्भनिरोधक गोळीचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडत नाही. गोळी घेणे थांबवल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांत स्त्रीची सामान्य मासिक पाळी पुन्हा सुरू होते. परंतु गर्भनिरोधक बंद केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत मासिक पाळी सामान्यपणे पुन्हा सुरू झाली नाही तर स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुरुषाचे विर्य स्खलन झाले तर दोष त्याच्यात नाही.

पुरुष वंध्यत्व ओळखणे कठीण आहे. बहुतेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पुरुषांमध्ये वंध्यत्व कमी शुक्राणूंच्या संख्येमुळे होऊ शकते, ज्याची लोक कल्पना करतात. पण यात शुक्राणूंची हालचाल आणि शुक्राणूंचा आकारही महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे पुरुष जास्त शारीरिक श्रम करतात किंवा जे दोन किंवा अधिक औषधे घेतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी असू शकते आणि उच्च रक्तदाबाचा शुक्राणूंच्या आकारावर वाईट परिणाम होतो.

अनियमित मासिक पाळीमुळे वंध्यत्व येते.

अनियमित मासिक पाळी खूप सामान्य आहे. कामाचा ताण, पुरेशी झोप न मिळणे आणि व्यायाम न करणे यामुळे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. जर तुम्हालाही असा त्रास अअनियमित मासिक पाळीची चिंता असेल. तर लवकर स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT