Yoga For Healthy Lungs: Sakal
आरोग्य

Yoga For Healthy Lungs: फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी 'या' योगासनांचा नियमितपणे करावा सराव

World Lung Cancer Day 2024: फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता.

पुजा बोनकिले

World Lung Cancer Day 2024: शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम फुफ्फुस करतात. त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे. फुफ्फुसाला मजबुत आणि त्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करण्यासह योगा करणेही गरजेचे आहे. यामुळे फुफ्फुस निरोगी राहते. दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी अनेक लोक या आजाराला बळी पडतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुरूवातीला छातीत दुखणे, श्वास लागणे, श्वास घेतांना आवाज येणे, खोकल्यासोबत रक्त येणे यासारखी लक्षणे दिसतात. या आजाराला दूर ठेवण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. तसेच या दिवसानिमित्त जाणून घेऊया फुफ्फुसाला निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या योगासनांचा नियमितपणे सराव करावा.

Kapalbhati

कपालभाती

कपालभाती प्राणायम करून तुम्ही फुफ्फुसाला मजबुत आणि निरोगी ठेऊ शकता. हा एक श्वासोच्छवाश्वासाचा व्यायाम आहे. नियमितपणे सकाळी सराव केल्यास श्वसनासंबंधित समस्या दूर होतात. तसेच वजन कमी करण्यासाठी हा योगा फायदेशीर आहे.

Navasana

नौकासन

नौकासन केल्याने फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत मिळते. या आसनामुळे स्नासू, पचन, रक्ताभिसरण सुरळितपणे कार्य करते.

Bhujangasan

भुजंगासन

भुजंगासन करताना फुफ्फुसांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे शरीरात जास्त ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहते.

Trikonasan

त्रिकोणासन

त्रिकोणासन केल्याने मज्जासंस्था सक्रिय राहते आणि फुफ्फुसाचे आरोग्य देखील निरोगी राहते. त्रिकोणासन केल्याने फुफ्फुसाशिवाय शरीराचा खालचा भाग आणि पाठीचा कणा निरोगी राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

Latest Marathi News Updates : चांदणी नदीच्या पुरात वाहणाऱ्या व्यक्तीला तरुणांनी जीवाची बाजी मारत वाचवले

Asia Cup 2025: पाकिस्तान - युएई सामना होणार? आता PCB ने केली मोठी विनंती; खेळाडू स्टेडियमकडे रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : आमदार विलास भुमरे प्रभारी जिल्हाप्रमुख; पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघांची दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT