World Osteoporosis Day 2022 esakal
आरोग्य

World Osteoporosis Day 2022: वयानुसार हाडे कमकुवत होतात, 'ही' लक्षणे दिसताच सावध

हाडे कमकुवत होण्याचे मुख्य कारण म्हणजे कॅल्शिअमची कमतरता

सकाळ डिजिटल टीम

Health News: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे आरोग्याकडे दूर्लक्ष होते. खाण्यापिण्यातील बदल, बदलती जीवनशैली याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होत असतो. आणि त्यातही तुमची हाडं जर का कमकुवत असतील तर तुमची इम्युनिटी आणखीच डाउन होण्याची शक्यता असते. हाडे कमकुवत होण्याचे मुख्य कारण म्हणजे कॅल्शिअमची कमतरता. तुमची हाडे कमकुवत झाली आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचा ही महत्वाची लक्षणे. (Bone Health)

कमकुवत हिरड्या- जेव्हा हाडांच्या कमकुवतपणामुळे हिरड्यांचा (weak gums) त्रास होतो. तेव्हा जबड्याचे हाड (jaw bone) दातांवर पकड ठेवते आणि वयानंतर इतर हाडांप्रमाणे कमकुवत होते. कमकुवत जबड्यांमुळे दात देखील खराब होऊ शकतात.

हाडे कमकुवत होणे - हातांची पकड आणि मनगट, पाठीचा कणा आणि नितंब यांच्या हाडांची घनता (Bone density) यांच्यातील संबंध अनेक अभ्यासांमध्ये आढळून आला आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून आले.

नखांमध्येही दिसून येतात लक्षणे - जर तुमची नखे वारंवार तुटत असतील तर तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि कोलेजनची (calcium and collagen) कमतरता असू शकते. तुमची हाडे कमकुवत होण्याचं हे प्राथमिक लक्षण असू शकतं.

क्रँम्प्स किंवा मसल्स पेन: विटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमसह अनेक जीवनसत्व आरोग्यासाठी आवश्यक आहे. याची तुमच्या शरीरात कमतरता झाल्यास तुमच्या शरीरात क्रँम्प्स येऊ शकतात.

शरीर वाकणे - तुमची हाडे फ्रॅक्चर झाल्यास तुमचं शरीर पुढे झुकू शकतं. कमजोर हाडांचं हे प्राथमिक लक्षण असू शकतं. तुमचा पाठीचा कणा जड वजनाशिवाय वाकत असेल किंवा मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू कमकुवत होऊ लागले आहेत. (Health News)

फिटनेस कमी होणे - जर तुमचा फिटनेस (Fitness) कमी होत असेल तर कदाचित तुमच्या हाडांची घनता कमी होत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वजन कमी करण्याच्या व्यायामामुळे हाडांची झीज कमी होते आणि कॅल्शियम आणि हाडे तयार करणाऱ्या पेशींद्वारे हाडे मजबूत होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT