आरोग्य

World Toilet Day 2022 : ​इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं आहे बेस्ट

आज भारतात अनेक ठिकाणी इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेट पाहण्यास मिळतात.

सकाळ डिजिटल टीम

Indian Or Western Which Toilet Is Best For Health : स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी शौचालय घरोघरी शौचालय असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

toilet

आज भारतात अनेक ठिकाणी इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेट पाहण्यास मिळतात. अनेक घरांमध्ये वेस्टर्न आणि इंडियन अशी दोन्ही टॉयलेट असतात. मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की, या दोन टॉयलेटपैकी आरोग्यासाठी नेमकं कोणतं चांगलं आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही टॉयलेटचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.

वेळ आणि गरजेनुसार दोन्ही टॉयलेटचे स्वतःचे असे महत्त्व आहे. तसेच अनेक संशोधनांनुसार असे दिसून आले आहे की, वेस्टर्न टॉयलेट जरी सुंदर, दर्जेदार आणि आरामदायी दिसत असली तरी त्याचे अनेक तोटे आहेत.

वेस्टर्न टॉयलेटचे तोटे

1. संशोधनानुसार, पूर्वीचे भारतीय शौचालय आकाराने मोठे होते. यामुळे उठताना आणि बसताना आरामात व्यायाम होत असे. मात्र, सध्याचे वेस्टर्न टॉयलेट हे एखाद्या खुर्चीवर बसल्यासारखे आहे. यावर बसणे म्हणजे स्वतःला आजारी पाडण्यासारखेच आहे.

2. इंडियन टॉयलेटमध्ये बसल्यावर फ्रेश व्हायला 2 ते 3 मिनिटं लागत असे. पण आज वेस्टर्न टॉयलेटमध्ये 5 ते 10 मिनिटं बसूनही फ्रेश वाटत नाही. यामुळेच शरिरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत.

3. इंडियन टॉयलेटच्या तुलनेत वेस्टर्न टॉयलेटमध्ये जास्त पाणी लागते. एवढेच नव्हे तर, अधिकचे पाणी वापरूनही या टॉयलेटची हवी तशी स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे टॉयलेट पेपरचा वापर करावा लागतो, यामुळे येथे पाणी आणि कागद या दोन्हींचाही अपव्यय होतो.

4. वेस्टर्न टॉयलेट वापरल्याने तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे UTI चा धोका अधिक असतो. वेस्टर्न टॉयलेटमध्ये अनेकजण जात असतात. त्यामुळे एखाद्या आझाराचा संसर्ग होण्याची भीती अधिक असते.

वेस्टर्न टॉयलेटचे फायदे

हे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी इंडियन टॉयलेटपेक्षा वेस्टर्न टॉयलेट अधिक आरामदायक मानले जाते. याचा वापर केल्याने तुमच्या शरिरातील कोणत्याही स्नायूंवर ताण येत नाही. वेस्टर्न टॉयलेट विशेषतः वृद्ध, आजारी व्यक्तींसाठी सोयीचे आहे. ज्या व्यक्ती ऑस्टियो आर्थरायटिसने त्रस्त आहेत अशा व्यक्तींसाठीदेखील अतिशय उपयुक्त आहे.

इंडियन टॉयलेटचे फायदे

1. ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करू शकत नाहीत, अशा व्यक्तींनी इंडियन टॉयलेटचा वापर अवश्य करावा. यामुळे उठता बसता थोडासा व्यायाम होऊ शकतो.

2. इंडियान टॉयलेटमध्ये बसल्याने संपूर्ण पचनसंस्थेवर दबाव पडतो, ज्यामुळे तुमचे पोट व्यवस्थित साफ होते. हेच जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेटमध्ये बसल्यास प्रेशर कमी होते. त्यामुळे अनेकदा पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

3.गर्भवती महिलांसाठी इंडियन टॉयलेटचा वापर खूप फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. असे म्हटले जाते की, गर्भवस्थेत याचा वापर केल्याने नैसर्गिक प्रसूतीमध्ये खूप मदत होते.

4. इंडियन टॉयलेटमध्ये शरिराचा थेट संपर्क येत नसल्याने संसर्गाचा धोका कमी असतो.

5. इंडियन टॉयलेटच्या वापरामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्यांचा धोका कमी होतो. डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, भारतीयांच्या तुलनेत पाश्चात्य देशांतील लोकांना पोटाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो.

6. इंडियन टॉयलेटचा वापर केल्याने कोलन कॅन्सर आणि पोटाशी संबंधित इतर आजारांचा धोका राहत नाही. इंडियन टॉयलेटच्या वापरामुळे कोलनमधून विष्ठा पूर्णपणे काढून टाकण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, अॅपेन्डिसाइटिस, कोलन कॅन्सर आणि इतर प्रकारच्या रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते.

इंडियन टॉयलेटचे तोटे

1. वृद्ध व्यक्ती, ऑस्टियो आर्थरायटिसचे रुग्ण किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांसाठी याचा वापर त्रासदायक ठरू शकतो. याच्या वापरामुळे त्रास अधिक वाढू शकतो.

2. इंडियन टॉयलेटचा वापर करताना अधिक दबाव टाकल्याने मेंदूतील एन्युरिझम पेशींना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.

एकंदरीत, दोन्ही टॉयलेटचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील वरील फायदे आणि तोटे लक्षात घेऊन तुमच्या शरिरासाठी योग्य टॉयलेटची निवड करून शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT