Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : 'या' दिशेला झोपल्याने पडतात वाईट स्वप्न, जाणून घ्या योग्य दिशा

झोप तुमच्या शरीराला आराम देण्यासाठी आणि पुन्हा ऊर्जेने भरण्यासाठी आवश्यक असते. चुकीच्या दिशेला आणि वेळी झोपल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

सकाळ डिजिटल टीम

झोप तुमच्या शरीराच्या महत्वाच्या कामांपैकी एक आहे. ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जा मिळते. झोप शरीराला सक्रीय करते आणि दिवसभरात समपलेली एनर्जी पुन्हा मिळवून देते. त्यामुळे गाढ झोप आणि रात्री आवश्यक तेवढ्या वेळेची झोप मिळणे आवश्यक आहे. यासोबतच योग्य दिशेला झोपणेही आवश्यक आहे.

आयुर्वेदाचार्यांचे म्हणणे आहे की, योग्य दिशेला झोपणे याला वैज्ञानिक कारण आहे. हे समजून घेण्यासाठी चारही दिशांना पसरलेल्या ऊर्जेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. कारण याचा आपल्या आरोग्यावर चांगले वाईट परिणाम होतात.

उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने वाटते अस्वस्थ

उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. जर असे झोपले तर रात्रभर अस्वस्थ वाटते. मध्येच झोप तुटते. आयुर्वेदात मानले जाते की, या दिशेला वाहणाऱ्या मॅग्नेटिक वेव्ज डोक्यात प्रवेश करतात आणि ब्लड सर्क्यूलेशनवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे रात्री झोप नीट न झाल्याने सकाळी उत्साह वाटत नाही.

पूर्वेकडे डोकं करून झोपल्याने बुध्दी शार्प होते

पूर्व दिशेला डोकं करून झोपणे सर्वात चांगले समजले जाते. विशेषतः जेंव्हा तुम्ही स्मरणशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. या दिशेला झोपल्याने ब्लड सर्क्यूलेशन, एकाग्रता वाढणे, गाढ झोप व आरोग्यात सुधार होतो.

पश्चिमेकडे डोकं केल्याने पडतात वाईट स्वप्न

पश्चिमेकडे डोकं केल्याने रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही. वास्तूशास्त्रानुसार या दिशेला डोकं केल्याने वाईट स्वप्न पडतात. ज्यामुळे रात्रभर अस्वस्थ वाटते.

दक्षिणेला डोकं करून झोपल्याने मिळते ऊर्जा

दक्षिणेला गाढ झोपेची दिशा म्हणतात. दक्षिणेला निगेटिव्ह फोर्स असतो तर अपलं डोकं पॉझिटिव्ह फोर्स असतो. त्यामुळे या दिशेला झोपल्याने पॉझिटिव्ह, निगेटिव्ह यांच्यात आकर्षण निर्माण होतं. या दिशेला झोपल्याने आरोग्य, सुख आणि समृध्द करणारी ऊर्जा वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत पुन्हा विमान अपघात, रेडबर्डची अपघाताची परंपरा; DGCA घातलेली बंदी

नाशिकमधून नीटचा पेपर फुटला, अहिल्यानगरच्या आणखी एकाला अटक; पुणे कनेक्शन आलं समोर

Gold Rate Today: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोन्याचे भाव भडकले! अवघ्या 10 तासांत 14 हजारांची वाढ; काय आहे ताजा भाव?

Latest Marathi News Live Update : मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी चार लाख मदतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

Yogi on Pratik Yadav: प्रतीक यादव यांच्या निधनावर योगी आदित्यनाथ भावूक; यादव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत व्यक्त केल्या सहवेदना!

SCROLL FOR NEXT