Yoga For Arthritis esakal
आरोग्य

Yoga For Arthritis : सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा ‘ही’ योगासने, जाणून घ्या सरावाची सोपी पद्धत

Yoga For Arthritis : संधिवात या आजारापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Arthritis : मागील काही वर्षांमध्ये संधिवात या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. संधिवात हा एक सामान्य आजार आहे, हा आजार सांध्यांवर परिणाम करतो. १०० पेक्षा अधिक प्रकारचे संधिवात आहेत, जे सांध्यांतील स्वत:च्या पेशींवरच हल्ले करतात. या आजारामुळे पायांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना होतात.

संधीवाताची काही सामान्य लक्षणे आहेत, जसे की, वेदना, सूज, लालसरपणा आणि चालण्याची क्षमता कमी होणे इत्यादी लक्षणे आहेत. परंतु, यावर उपचारांसोबतच तुम्ही योगाची ही मदत घेऊ शकता. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही काही योगासनांचा सराव दररोज करू शकता. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

त्रिकोणासन

हे योगासन संधिवातासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पायांमध्ये अंतर ठेवून सरळ उभे राहा. आता श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडत तुमचे शरीर उजव्या पायाच्या दिशेने वाकवा आणि तुमचा हात सरळ तुमच्या डोक्यावर न्या.

आता तुमचा उजवा हात तुमच्या उजव्या कानाला समांतर असल्याची खात्री करा. त्यानंतर, तुमचा डावा हात तुमच्या पायाच्या पोटरीजवळ, घोट्यावर किंवा जमिनीला समांतर ठेवा. आता तुमचे शरीर बाजूला वाकले पाहिजे. आता श्वास घ्या आणि वरच्या दिशेला शरीर न्या आणि सुरूवातीच्या स्थितीमध्ये परत या. आता दुसऱ्या पायानेही असेच करा.

वृक्षासन

वृक्षासन हे योगासन करायला अतिशय सोपे असून, या योगासनाच्या नियमित सरावामुळे शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा. आपले दोन्ही हात बाजूला ठेवा. आता तुमचा उजवा गुडघा वाकवा आणि तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.

या स्थितीमध्ये सरळ रहायचा प्रयत्न करा आणि शरीराचा तोल सांभाळा. आता श्वास घ्या आणि तुमचे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वरच्या दिशेला न्या. तुमच्या दोन्ही हातांचे तळवे एकत्र आणा, नमस्काराच्या मुद्रेमध्ये. आता सरळ पुढे व्हा, तुमची पोझ आहे तशी कायम ठेवा. या स्थितीमध्ये तुमच्या पाठीचा कणा सरळ असल्याची खात्री करा. काही वेळ या पोझमध्ये राहिल्यानंतर श्वास सोडा आणि पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT