Yoga For Shoulder Pain esakal
आरोग्य

Yoga For Shoulder Pain : खांदेदुखीमुळे त्रस्त आहात? मग 'या' २ योगासनांची घ्या मदत

पाठदुखी आणि खांदेदुखीवर आराम मिळवण्यासाठी योगा लाभदायी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Shoulder Pain : सतत लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसमोर काम केल्यामुळे अनेकांना पाठदुखीची समस्या भेडसावते. परंतु, फक्त पाठदुखीचा त्रास होतो असे नाही, तर अनेकांची मान दुखते, खांद्यांमध्ये तीव्र वेदना होतात आणि डोळे-डोकेदुखीचा त्रास देखील संभवतो.

कधी कधी या वेदना एवढ्या वाढतात की, थेट डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे, पाठदुखी, खांदेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. सतत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे या समस्या निर्माण होतात.

मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पाठदुखी आणि खांदेदुखीवर योगा लाभदायी आहे. योगा हा संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज आपण खांदेदुखीला आराम मिळवून देणाऱ्या काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत.

पर्वतासन

पर्वतासन हे योगासन खांदेदुखीसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर योगासन आहे. या योगासनामध्ये आपल्या शरीराची मुद्रा ही पर्वतासारखी दिसते. पर्वतासन हे पाठदुखी, कंबरदुखी आणि खांदेदुखीपासून आपल्याला आराम मिळवून देते.

हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • हे योगासन करण्यासाठी जमिनीवर सरळ पाय रोवून बसा.

  • आता दोन्ही पाय खालच्या दिशेने वर उचला आणि दोन्ही हात खाली टेकवा.

  • दोन्ही हातांवर ताण देऊन पुशअपच्या स्थितीमध्ये या.

  • आता, दोन्ही हातांच्या मध्ये तुमचे डोके न्या.

  • त्यानंतर, दोन्ही पायांच्या मधोमध डोके नेण्याचा प्रयत्न करा.

  • आता या स्थितीमध्ये ताठ थांबण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये तुमच्या शरीराला चांगला ताण बसेल.

  • आता या स्थितीमध्ये ३०-३५ सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा.

गोमुखासन

गोमुखासन हे योगासन करायला अतिशय सोपे असे आसन आहे. त्यासोबतच, आपल्या आरोग्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. हे योगासन तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या जागी ही करू शकता.

हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • गोमुखासन हे योगासन करण्यासाठी तुमचा एक हात वर करून तो पाठीमागे न्या.

  • त्यानंतर, आता दुसरा हात खालून मागच्या बाजूला पाठीवर नेऊन त्या दुसऱ्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करा.

  • आता बोटांच्या मदतीने दोन्ही हात पाठीमागे धरण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये ३५-४० सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा.

  • आता, हीच स्टेप पुन्हा दुसऱ्या हाताने करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT