Yoga sakal
आरोग्य

Vastu Tips For Yoga: योग अन् प्राणायाम करून फायदा होत नाहीये? मग ही दिशा ठरेल उत्तम

चांगले आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग आणि प्राणायाम करणे फायदेशीर आहे.

Aishwarya Musale

वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी कोणती दिशा योग्य आहे, याची माहिती दिली आहे. जर आपण या दिशा लक्षात घेऊन कार्य करत राहू तर आपल्याला कोणत्याच कामात अपयश येणार नाही. वास्तूचे नियम लक्षात ठेवले नाहीत तर घरात वास्तू दोष निर्माण होतात.  दिशांची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जीचा प्रवाह उत्पन्न होऊ लागतो. यामुळे आपल्या जीवनातील प्रगतीवर अडचण येऊ लागते, शिवाय अनेक संकटे येत असतात. 

चांगले आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग आणि प्राणायाम करणे फायदेशीर आहे. मात्र, वेळेअभावी अनेकजण योगा आणि प्राणायम करण्याच्या योग्य पद्धतीकडे दूर्लक्ष करतात. ज्यामुळे समाधानकारक परिणाम मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया योग आणि प्राणायामाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम. 

योग आणि प्राणायामाचे महत्त्व

योगाचे अनेक भागात विभाजन केले आहे. योगाच्या 8 भागांपैकी चौथ्या भागाला प्राणायाम असे म्हणतात. प्राणायाम हा दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिला प्राण आणि दुसरा परिमाण, म्हणजे जीवनाचा विस्तार. प्राणायाम हा शरीरातील शक्ती नियंत्रित आणि संतुलित करण्यासाठी केला जातो.

धावपळीच्या जीवनात आजार, मानसिक ताण, स्नायू दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळण्यासाठी योगासन केल्यामुळे फायदा होऊ शकतो. योगामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे योगासने करण्याचा सल्ला दिला जातो.

योगा करण्याचे नियम

शास्त्रात योगासने करण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. कोणताही प्राणायाम करण्यासाठी सर्वात प्रथम सुखासन, पद्मासन आणि सिद्धासन स्थितीत बसा. शक्यातो प्राणायाम सकाळी लवकर करा. प्राणायाम करताना चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. कोणत्याही प्रकारचा आवाज नसेल अशा ठिकाणी प्राणायम केल्याने फायदा होतो.

वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला तोंड करून योगासन किंवा प्राणायाम केल्याने अधिक फायदा होताे. ईशान्य दिशेला बसून प्राणायम आणि योगा केल्याने आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. ज्या ठिकाणचे वातावरण शुद्ध आहे आणि जेथे हवा खेळती आहे अशा ठिकाणी बसून प्राणायम आणि योगा केल्यास अधिक फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT