Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : पाठदुखी अन् कंबरदुखीमुळे त्रस्त आहात? मग, ‘या’ योगासनांची घ्या मदत, मिळेल लवकर आराम

Yoga Tips : बैठे काम किंवा चुकीच्या आसनांमुळे अंगदुखी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि जंकफूडचे वाढलेले व्यसन इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बैठे काम किंवा चुकीच्या आसनांमुळे अंगदुखी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी घरातील वयोवृद्ध लोकांना अंगदुखी असायची, आता तरूण वयातच अंगदुखीची तक्रार वाढू लागली आहे.

अनेकांना उठताना, बसताना आणि वाकताना पाठ आणि कंबरदुखीचा त्रास संभवतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. परंतु, या व्यतिरिक्त पाठदुखी आणि कंबरदुखीपासून तुम्ही योगाच्या मदतीने आराम मिळवू शकता. परंतु, योगा मार्गदर्शकांच्या सल्ल्यानेच योगाचा सराव करा. आज आम्ही तुम्हाला पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही योगासनांबद्दल सांगणार आहोत.

शलभासन

शलभासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पाठदुखी अन् कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही शलभासनाचा सराव करू शकता. हे योगासन सर्व वयोगटातील व्यक्ती करू शकतात.

शलभासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा आणि दोन्ही हातांचे तळवे पायांच्य मांडीजवळ ठेवा. त्यानंतर, दोन्ही पायांची टाच एकमेकांना जोडून तुमची बोटे सरळ ठेवा. त्यानंतर, हळूहळू पाय वर करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही पाय वरच्या दिशेने हलवताना दीर्घ श्वास घ्या आणि काही काळ या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पाय पुन्हा खाली घ्या आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

भूजंगासन

पाठदुखीपासून आणि कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर ठरते. भूजंगासन हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. हे योगासन करताना सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर जमिनीवर झोपा, आता तुमचे दोन्ही पाय जुळवून घ्या आणि कपाळ जमिनीवर टेकवून शरीर सैल सोडा. या स्थितीमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

आता दीर्घ श्वास घ्या आणि शरीराचा पुढील भाग वर उचला. दोन्ही हात सरळ ठेवा आणि काही सेकंद या आसनात राहा. त्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT