Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : उच्च रक्तदाबामुळे त्रस्त आहात? मग, दररोज ‘या’ योगासनांचा करा सराव

Yoga Tips : नियमित योगासनांचा सराव केल्याने तुम्ही उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : मागील काही वर्षांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, तणाव, किडनीचे आजार, हृदयाच्या समस्या आणि काही वेळा अनुवांशिक  आजार देखील यामागे असू शकतात. सध्याची बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी देखील यामागचे प्रमुख कारण असू शकते.

उच्च रक्तदाबाची ही समस्या केवळ औषधोपचारांनी बरी होते, असे नाही तर त्यासोबत आहारातील पथ्ये आणि योगाची मदत घ्यावी लागेल. नियमित योगा केल्याने तुम्ही उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करू शकता.

शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित योगासनांचा सराव करणे फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाची समस्या कमी करणारी कोणती योगासने आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

बालासन

बालासन या योगासनाला ‘चाईल्ड पोझ’ असे ही म्हटले जाते. हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बालासनाचा नियमितपणे सराव केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत होते. हे योगासन केल्याने तणाव कमी होतो आणि संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

दररोज या योगासनाचा सराव केल्याने मान आणि खांद्यातील ताण कमी होतो आणि स्नायू मजबूत होतात. उच्च रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी दररोज बालासनाचा सराव करा.

सूखासन

सूखासन हे योगासन आपल्या शारिरीक अन् मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. नियमितपणे या योगासनाचा सराव केल्याने श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवता येते. मानसिक शांती वाढवून तणाव कमी करण्यासाठी देखील हे योगासन उपयुक्त मानले जाते. ज्यामुळे, उच्च रक्तदाबापासून आराम मिळू शकतो.

एवढेच नव्हे तर या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने पाठदुखी आणि मानदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, विविध आजारांसाठी आणि उच्च रक्तादाबासाठी उपयुक्त असणाऱ्या या योगासनाचा दररोज सराव करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT