yoga Utthita Parshvakonasana  sakal
आरोग्य

Parshvakonasana : पार्श्वकोनासन

पार्श्वकोनासन हे दंडस्थितीमधील आसन आहे.

सकाळ वृत्तसेवा

पार्श्वकोनासन हे दंडस्थितीमधील आसन आहे.

असे करावे आसन

  • प्रथम ताठ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पायात साधारण अडीच ते तीन फुटांचे अंतर घ्यावे. (उंचीनुसार कमी-जास्त अंतर घेणे.)

  • दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर येतील एवढेच वर घ्यावे.

  • नंतर उजवे पाऊल उजव्या बाजूला वळवावे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून साधारण मांडी व पोटरीमध्ये काटकोन असेल असे बघावे. उजवी मांडी जमिनीला समांतर असावी.

  • उजवा गुडघा घोट्याच्या पुढे जाणार नाही ही काळजी घ्यावी.

  • हळू हळू कमरेतून उजव्या बाजूला वाकावे आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला जमिनीवर टेकवावा.

  • डावा हात वरच्या बाजूला घेऊन डावा दंड डाव्या कानाला टेकवावा.

  • डाव्या हाताचा तळवा जमिनीकडे वळलेला असावा.

  • छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घ्यावी.

  • एकाबाजूला आसन करून झाले की दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचे फायदे

  • या आसनाच्या नियमित सरावाने कंबरेला, पायाला, खांदा व हातात उत्तम ताण बसतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

  • तेथील स्नायूंची लवचिकता व ताकद वाढते.

  • शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. वात कमी होतो.

  • फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्याने अस्थमा, बालदमा, श्वसनाचे त्रास कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT