Health Care esakal
आरोग्य

Health Care : तुमची रोजची ही सवय ठरु शकते जीवघेणी, अभ्यासातून पुढे आले गंभीर सत्य

पुरेशी झोप झाली नाही तर तुमचा अकाली मृत्यूसुद्धा होऊ शकतो

सकाळ ऑनलाईन टीम

Daily Routine Bad Habits : आपल्या रोजच्या आहारासोबत आपल्याला पुरेशी झोपदेखील आवश्यक असते. त्यामुळे तज्ज्ञही आपल्याला पुरेशी झोप घ्यायला सांगतात. नुकताच अहवालातून एक धक्कादायक खुलासा झालाय की ज्यांना Insomnia म्हणजेच झोपेचा त्रास आहे त्यांना डिमेंशियाचा धोका जास्त असतो. इतकंच नव्हे तर पुरेशी झोप झाली नाही तर तुमचा अकाली मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिन इंस्ट्रक्टर रेबेका रॉबिन्सन यांच्या म्हणण्याप्रमाणे समोर आलेल्या पुराव्यांवरून असं दिसून येतंय की रात्रीची झोप आपल्या आयुष्यासाठी फार महत्त्वाची असते. हे केवळ आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमसाठीच फायदेशीर ठरत नाही तर मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अमेरिकेसोबत जगभरात लोकांमध्ये झोप, डिमेंशिया आणि इतर कारणांनी लवकर मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतेय. ही बाब गंभीर असून हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. 'वर्ल्ड स्लीप सोसायटी'च्या मते, कमी झोप येणं जगभरात 45 टक्के लोकसंख्येच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

ज्यांना झोपेसंबंधित समस्या आहेत त्यांचा समावेश या अभ्यासात करण्यात आलेला होता. अभ्यासानुसार असं आढळलं आहे की, जवळजवळ दर रात्री झोपेसंबंधी समस्या अनुभवणार्‍या 44 टक्के लोकांना इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका असतो. तर बहुतेक प्रमाणात या समस्येचा त्रास असलेल्या 56 टक्के लोकांना लवकर मृत्यूचा धोका असतो.

सामान्यपणे माणसाने दररोज 7 ते 10 तासांची झोप घेतली पाहिजे. मात्र अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यांच्या म्हणण्याप्रमाणे, अमेरिकेतील प्रत्येक तिसरा व्यक्ती या झोपण्याच्या नीट सवयी फॉलो करत नाही.

अहवालानुसार अमेरिकेत सुमारे 5 ते 7 करोड लोक स्लीप डिसॉर्डर, स्लीप एपनिया, इंसोमेनिया और रेस्टलेस लेग सिंड्रोम यांसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. सीडीसीच्या सांगण्यानुसार, झोपेशी निगडीत ही समस्या मधुमेहाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे स्ट्रोक, हृदयासंबंधीचे आजार आणि डिमेंशिया यांच्याशी देखील संबंध दिसून येतो. (Health News)

टीप - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी सपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT