Sesame Oil Benefits esakal
आरोग्य

Sesame Oil Benefits: तुम्ही कधी तिळाचे तेल खाल्लंय का? खाऊन तर बघा तब्बेत कशी सुधारतेय!

Sesame Oil Benefits: तिळाचे तेल मानसिक आणि शारिरीक आजारावर उपयोगी

Pooja Karande-Kadam

Sesame Oil Benefits: अनेक लोक तिळाचे तेल स्वयंपाकात तेल म्हणून वापरतात. जेवणाची चव वाढवणारे तिळाचे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तिळाचे तेल हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आजकाल हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्या कमी वयातच समोर येत आहेत. अशा परिस्थितीत तिळाच्या तेलाचे नियमित सेवन करणे खूप प्रभावी ठरू शकते. तिळाच्या तेलात असलेले घटक हृदयासाठी फायदेशीर असण्यासोबतच पित्तामुळं होणारी जळजळ ही थांबवतात.

यासोबतच उन्हाळ्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे रक्षण करते.भारतीय घरांमध्ये तिळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तिळाचे तेल फक्त तिळापासून काढले जाते. वेबएमडीनुसार, तिळाच्या तेलात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. त्याच्या वापराने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

तिळामध्ये असलेले गुणधर्म 

  • कॅलरीज: 120

  • फॅट: 14 ग्रॅम

  • ओमेगा 3

  • ओमेगा 6

  • ओमेगा ९

  • अँटी ऑक्सिडंट्स

  • व्हिटॅमिन ई

  • व्हिटॅमिन बी

  • मॅग्नेशियम

  • फ्लॅवेनोइड्स

  • कॉपर

मधुमेह

सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मधुमेहात तिळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तिळाचे तेल रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रौढ व्यक्तींनी तिळाच्या तेलाचे सेवन केल्याने उपवास रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिन कमी होते.

नैराश्य

आजच्या धावपळीच्या जीवनात इच्छा नसतानाही तणाव निर्माण होतो. सततच्या तणावामुळे अनेक जण डिप्रेशनचेही बळी होतात. विशेषत: तरुणांच्या मानसिक आरोग्यावर आजकाल खूप परिणाम झाला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तणाव आणि नैराश्यासारख्या समस्यांमध्ये तिळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तिळाच्या तेलात टायरोसिन नावाचे एमिनो अॅसिड असते जे सेरोटोनिन वाढवते आणि त्यामुळे तणाव आणि नैराश्यासारख्या भावनांशी लढण्यास मदत होते.

त्वचेचे नुकसान

सूर्यापासून निघणाऱ्या किरणांमुळे अनेकांची त्वचा खराब होते. अशा परिस्थितीत तिळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तिळाच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला अतिनील हानीपासून वाचवतात, असे काही संशोधनातून समोर आले आहे.

तिळाचे तेल अतिनील किरणांना 30 टक्क्यांपर्यंत अवरोधित करते, तर इतर तेले केवळ 20 टक्क्यांपर्यंत असे करू शकतात. तिळाचे तेल केसांसाठीही फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT