weekly horoscope 12th may 2024 to 18th may 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ मे २०२४ ते १८ मे २०२४)

आपल्या संस्कृतीत माणसाच्या जीवनप्रवाहाचा गंगेशी संबंध जोडला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाशी आणि या संगमावर स्नान केल्यावर माणसाच्या अनंत जन्मजन्मांतरीच्या कर्मांना तिलोदकाच्या स्वरूपात गंगेत विसर्जित करता येतं आणि त्याला मोक्ष मिळवता येतो.

श्रीराम भट

मोठी कामं होतील

मेष : राशीतील ग्रहयोगांतून थोडं संमिश्र ग्रहमान राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यात. दुखापतीपासून जपावं. बाकी रवी - गुरु सहयोगाची अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम साथ मिळेल. ओळखी-मध्यस्थीतून मोठी कामं होतील. ता. १५ ची दुर्गाष्टमी सरकारी कामांची असेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सर्व माध्यमांतून शुभसंबंधित. विवाहयोग आहेत.

व्यवसायातली कोंडी संपेल

वृषभ : कृत्तिका नक्षत्रास रवी-गुरु शुभयोगाचे उत्तम पाठबळ मिळेल. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. सप्ताहाचा शेवट मोठा गोड राहील. रोहिणी नक्षत्राच्या तरुणांच्या सुवार्ता धन्य करतील. ता. १५ व १६ हे दिवस घरात कार्ये ठरवणारे. व्यावसायिक क्षेत्रातली आर्थिक कोंडी जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विचित्र धावपळीचा. वाहनांपासून सांभाळा. मित्रांशी वाद नकोत.

कलावंतांना मोठे लाभ होतील

मिथुन : शुक्रभ्रमण हर्षलच्या योगात पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी सुंदर फळं देईल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ मिळतील. कलावंतांना मोठे लाभ होतील. मात्र सप्ताहारंभी कोणताही जुगार टाळा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सांभाळा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरातील कोणाच्या आरोग्यचिंतेचा ठरू शकेल. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट पुत्रचिंता घालवेल.

व्यावसायिकांना चांगला कालखंड

कर्क : तरुणांना शुक्रभ्रमण मोठं ग्लॅमर देईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी लाभ होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ होतील. ता. १५ ते १६ हे दुर्गाष्टमीचे प्रभावक्षेत्र मोठं प्रवाही राहील. विलंबित व्यावसायिक येणी येतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी कायदेशीर बाबी सांभाळाव्यात. बाकी एकूणच सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना छानच. अष्टमी वैयक्तिक मोठ्या उत्सव-समारंभाची. वास्तुयोग आहेत.

तरुणांना मोठ्या संधी येतील

सिंह : ग्रहयोगांतून एक सुंदर पॅकेज सप्ताहावर अंमल करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम लाभ घेतील. पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना देशात व परदेशात मोठ्या संधी प्राप्त होतील. विवाहविषयक प्रीतीचे धागे जुळून येतील. ज्योतिषी आड आणू नका. ता. १५ व १६ हे अष्टमीच्या प्रभावक्षेत्रातील दिवस सर्व प्रकारांतून उत्तम योग जुळवून आणणारे. मघा नक्षत्राच्या व्यक्तींवर दैवी कृपा होईल.

नोकरीतला ताणतणाव संपेल

कन्या : उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुकृपेतून परिस्थितीजन्य लाभ होतील. घरात तरुणांची कार्ये ठरतील. सप्ताहारंभी बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ आणि सप्ताहाचा शेवट मोठ्या गोड बातम्यांचा. नोकरीतील ताणतणाव जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात संसर्गजन्य बाधेपासून जपावं. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. बाकी शनिवार व्यावसायिक धनलाभांचा.

सरकारकडून बहुमान लाभेल

तूळ : सप्ताह ता. १५ मेच्या अष्टमीच्या प्रभावात विजयी चौकार-षटकार मारणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात वलयांकित करणारी. नोकरीत कर्तृत्वाला उजाळा देणारे प्रसंग घडतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा झगमगाट करवेल. कलाकारांना सरकारी बहुमान मिळेल. मात्र सप्ताहात शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर सावध क्रिया-प्रतिक्रिया द्या.

भागीदारीतून लाभ होतील

वृश्चिक : ग्रहयोगातून गुरुचे पाठबळ राहील. फक्त ‘आम खानेसे मतलब’ ठेवा. सहवासातील अहंकारी व्यक्तींशी जपून राहा. विशाखा नक्षत्रास सरकारी माध्यमातून मदत मिळेल. वादग्रस्त वसुली कराल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात ज्वरपीडा शक्य. मात्र सप्ताहात व्यावसायिक भागीदारीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट गाठीभेटींतून चमत्कार घडवेल. विवाहातील अडसर जातील.

ध्येय-आकांक्षा पूर्ण होतील

धनु : सप्ताह तरुणांना मोठ्या संधी देईलच. शिवाय विशिष्ट ध्येय-आकांक्षा पूर्ण करणारा सप्ताह. ता. १५ व १६ चे अष्टमीचे प्रभावक्षेत्र व्यावसायिक उलाढालींतून मोठी भाग्यबीजं पेरेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. कलाकारांचं मोठं पर्व सुरू होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्तचिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार सन्मानाचा.

नोकरीत-प्रेमात यश

मकर : सप्ताहात शुभग्रहांचं मोठं पॅकेज राहील. मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी कामांतून उत्तम साथ देणारे ग्रहमान. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरगुती पार्श्वभूमीवरील सुवार्तांतून जल्लोष करणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ. प्रेमविवाह संपन्न होतील. अर्थातच परदेशात श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना खर्चाचे प्रसंग येतील.

छंद व उपक्रमातून यश

कुंभ : साडेसातीतही शुभ ग्रहांचं पॅकेज क्रियाशील राहीलच. छंद आणि उपक्रमांतून मोठं यश देणारे शुभ ग्रहांचे योग राहतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर असे विवाहयोग. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण अगदी झुकतं माप देईल. मनासारख्या सतत घटना. मित्र-मैत्रिणींची उत्तम साथ मिळेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास नोकरीच्या मुलाखतींतून यश. शनिवार छान घडामोडींचा असेल.

उष्माघातापासून काळजी घ्या

मीन : ग्रहयोगांचं एक दुर्मीळ पॅकेज अस्तित्वात राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट तरुणांचं नैराश्य घालवेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक बुद्धिचातुर्यातून लाभ देईल. घरातील विशिष्ट सुवार्तांची पार्श्वभूमी मौजमजा करवेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी उष्माघात सांभाळावा. काहींना स्त्री चिंता शक्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT