weekly horoscope 17th march 2024 to 23rd march 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मार्च २०२४ ते २३ मार्च २०२४)

पंचमहाभुतांच्या समन्वयातून फुलणारी ही सृष्टी मोठी अजब आहे. सहज उमलणं हे सृष्टीचा किंवा निसर्गाचा स्वभावच आहे किंवा तो एक निसर्गाचा शुद्ध भावच आहे.

श्रीराम भट

आर्थिक ओघ वाढेल

मेष : सप्ताहातील शुक्र-शनि युतियोग व्यावसायिकांना आर्थिक ओघ प्राप्त करून देणारा.भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट पती वा पत्नीचा भाग्योदय करणारा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह पुत्रोष्कर्षातून धन्य करेल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे एकादशीच्या प्रभावक्षेत्रातील दिवस विशिष्ट प्रकाराचे नवस फेडणारे ठरतील. ग्रासलेली चिंता जाईल.

वादग्रस्त येणं वसूल होईल

वृषभ : शुक्र-शनि युतियोगाचे फिल्ड नोकरीतील घडामोडींतून प्रसन्न ठेवेल. वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सार्वजनिक जीवनातून सांभाळण्याचा. बाकी शुक्रवार धन वर्षावाचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ व २० हे दिवस व्यावसायिक शुभारंभ करतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विशिष्ट स्पर्धात्मक यशाचा. बढती मिळेल.

महत्त्वाचे व्यवहार होतील

मिथुन : जीवनाचा छान सूर गवसेल. व्यावसायिकांची मंदी जाईल. नवपरिणितांना फाल्गुन मास जीवनात रंग भरणाराच. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-शनि युतियोगाचं पॅकेज भरभक्कम लाभ देईल. खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. आर्दा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्री वर्गाकडून लाभ. विवाहातील अडसर दूर करणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीची शक्यता.

सरकारी कामं होतील

कर्क : सप्ताह व्यावसायिकांना भांडवलाचा पुरवठा करणारा ठरेल. न्यायालयातलं प्रकरण सामोपचारानं सुटेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना एकादशी दैवी प्रचितीची असेल. घरात सुवार्तांचा भर. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना संतसहवास. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार थोरामोठ्यांच्या गाठीभेटीचा.

छोट्या दुखापतींपासून सांभाळा

सिंह : सप्ताह अतिशय प्रवाही राहील. माणसांचं सतत सहकार्य मिळत राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक भाग्यबीजं पेरणाराच. तरुणांची विवाहाची प्रकरणं मार्गस्थ होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-शनि युतियोगाचं पॅकेज नोकरी, व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर छानच अंमल करेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजणं-कापणं यापासून सांभाळावं. बाकी शुक्रवार, शनिवार चैन, चंगळ, मौजमजेचाच असेल.

व्यवसायात वसुली होईल

कन्या : सप्ताहात अन्नपाण्यातील संसर्ग जपाच. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. शेजाऱ्यांशी जपून वागा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरीत सुवार्तांचा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस शुभग्रहांच्या साथसंगतीचे. विशिष्ट खरेदी-विक्रीचे व्यवहार संपन्न होतील. सरकारी कामं होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक क्षेत्रातली वसुली होईल.

घरात कार्य ठरेल

तूळ : सप्ताह मोठे परिस्थितीजन्य लाभ देईल. शनि-शुक्र सहयोगाचं प्रशासन राहील. नोकरीतील घडामोडी पथ्यावरच पडतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनसत्त्वांचा पुरवठा होईल. उद्याचा सोमवार स्वाती नक्षत्राच्या तरुणांना मुलाखतींतून यश देणारा. ता. २१ व २२ हे दिवस एकूणच आपल्या राशीस प्रसन्न ठेवतील. घरात कार्य ठरतील.

नवविवाहितांचे प्रश्‍न सुटतील

वृश्‍चिक : ता. २० ची एकादशी भाग्यलक्षणं दाखवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक हुरूप येईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती पार्श्‍वभूमीवर ग्रहमान उत्तमच राहील. नवविवाहितांचे प्रश्‍न सुटतील. सप्ताहाचा शेवट आपल्या राशीस मोठाच उत्साहवर्धक. परदेशस्थ तरुणांचे प्रश्‍न सुटतील.

हितशत्रूंना वचक बसेल

धनू : सप्ताहाची सुरवात मोठी नावीन्यपूर्ण फळं देईल. काहींना राजकीय लाभ अपेक्षित आहेत. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ घडतील. हितशत्रूंना आपोआप वचक बसेल. उद्याचा सोमवार सप्ताहाचं सुंदर पॅकेजच घोषित करेल. शिवाय पुढं शुक्रवार, शनिवार हे दिवस पुढे येणाऱ्या रंगपंचमीचीच तयारी करतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल.

व्यवसायात तेजी राहील

मकर : सप्ताहात झकास व्यावसायिक तेजी राहील. ता. २० ची बुधवारची एकादशी शुभग्रहांचा प्रभाव वाढवणारीच ठरल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट खरेदी-विक्रीतून लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पती व पत्नीच्या भाग्योदयातून प्रसन्नता.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

कुंभ : राशीतील शनि-शुक्र युतियोगाचं प्रशासन म्हणा किंवा पॅकेज म्हणा आपल्या राशीस अतिशय अनुकूल राहील. न बोलता लाभ घ्या! सप्ताहात जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुकृपेचा वर्षाव होईल. उद्याचा सोमवार याचीच प्रचिती देईल. ता. २२ ते २३ हा सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस भाग्यसूचक घटनांतून प्रसन्न ठेवेल.

शेअरबाजारात लाभ होईल

मीन : चंद्राच्या कलांचा प्रवास उत्तमच राहील. ता. १९ ते २१ हे उत्तम स्पंदनांचेच राहतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा नैराश्‍य जाईल. पती, पत्नीचा भाग्योदय थक्क करेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार शेअरबाजारांतून लाभ. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार दैवी प्रचितीचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT