weekly horoscope 31st december 2023 to 6th january 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (३१ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४)

जीवनाला गतीची उपमा देतात, जीवनाला प्रवाह म्हणूनही संबोधतात आणि शेवटी जीवन हे एक स्मृती होत एक प्रकारचं स्मारकही होत असतं.

श्रीराम भट

आरोग्यविषयक दिलासा मिळेल

मेष : सप्ताहात राशीतील गुरू मार्गी होऊन आत्मविश्वास वाढू लागेल. विशिष्ट कोर्टप्रकरण सुटेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना बुध मार्गी होऊन आरोग्यविषयक दिलासा मिळेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक कर्जमंजुरी होईल. पुत्रपौत्रांचे भाग्योदय. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक उत्सव समारंभ घडवेल.

विशिष्ट गुप्तचिंता जातील

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ विशिष्ट गुप्तचिंता घालवेल. तरुणांना ओळखीतून विवाहस्थळे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ व ४ हे दिवस घरी वा दारी मोठे ख्यालीखुशालीचे. नोकरीत सुवार्तांची पार्श्वभूमी राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची पंचमी पती वा पत्नीचा भाग्योदय करील.

व्यावसायिक भागीदारी यशस्वी

मिथुन : सप्ताहात बुधाचं राश्यांतर मृग नक्षत्राच्या व्यक्तींना तत्काळ बोलेल. तरुणांना नोकरीचे कॉल येतील. व्यावसायिक भागीदारी यशस्वी होईल. काहींना कर्जमुक्तीचा आनंद. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश मिळेल. ता. ३ ते ५ हे दिवस मोठे गतिमान राहतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ चा गुरुवार गुरुकृपेचाच.

वास्तुविषयक व्यवहारात लाभ

कर्क : पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात नोकरी - व्यावसायिक पार्श्वभूमीवर छानच राहील. एखाद्या शत्रुत्वाच्या झळा कमी होतील. सप्ताहातील अष्टमीचं प्रभावक्षेत्र शुभग्रहांच्या प्रभावात बोलेल. ता. ४ व ५ हे दिवस नावीन्यपूर्ण फळे देतील. वास्तुविषयक खरेदी-विक्रीतून लाभ.

मोठे चौकार-षटकार माराल

सिंह : सप्ताहात बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ उठवाल, मघा नक्षत्राच्या व्यक्ती मोठे चौकार-षटकार मारतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या फास्टट्रॅकचा. काहींना व्यावसायिक पातळीवर मोठ्या भांडवलाचा पुरवठा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ चा शुक्रवार भूतकाळातील अपयश धुवून काढणारा. तरुणांचा भाग्योदय. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशाचा व्हिसा मिळेल.

नोकरीत बढतीची चाहूल लागेल

कन्या : बुध मार्गी होऊन चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट आरोग्यचिंता जाईल. घरातील गर्भवतीची चिंता जाईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा उद्याचा सोमवार मोठा शुभलक्षणी राहील. नोकरीमध्ये बढतीची चाहूल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ जानेवारीचा अष्टमीचा गुरुवार पुत्रचिंता घालवेल. घरात शुभकार्ये ठरतील.

जुन्या गुंतवणुकीवर लाभ

तूळ : सप्ताहात व्यावसायिक विलक्षण तेजी राहील. काही व्यावसायिक आडाखे यशस्वी ठरतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती परिस्थितीजन्य लाभ उठवतील. ता. ३ ते ५ हे दिवस ओळखी-मध्यस्थीतून फलद्रूप होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे कोर्टप्रकरण सुटेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर बाजारातून अर्थातच जुन्या गुंतवणुकींतून लाभ.

आरोग्याच्या काही तक्रारी संपतील

वृश्चिक : सप्ताहात गुरू आणि बुध मार्गी होत आहेत. आरोग्यविषयक विशिष्ट तक्रारी संपतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शांत झोप लागेल. विशिष्ट कर्जफेड कराल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार खरेदी-विक्रीत सांभाळावा. ज्येष्ठा नक्षत्रास ता. २ ते ४ हे दिवस विवाहविषयक गाठीभेटींचे.

तरुणांना परदेशवारी घडेल

धनु : सप्ताहात ता. ४ जानेवारीच्या गुरुवारच्या अष्टमीपर्यंत चंद्रकलांचा एक उत्तम प्रवास राहील. त्याचा सर्वाधिक लाभ आपली रास घेईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या पतप्रतिष्ठेचा लाभ होईल. नोकरीत मानांकन मिळेल. तरुणांना परदेशवारी घडेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारची अष्टमी विजयोत्सवाची. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सूर्योदयी दुखापतींचा ठरू शकतो.

सरकारी माध्यमातून लाभ

मकर : सप्ताह सुरुवातीस शारीरिक वेदनायुक्त व्याधींतून त्रास देऊ शकतो. उत्तराषाढा व्यक्तींनी गैरसमज टाळावेत. वडीलधाऱ्यांशी भांडू नये. बाकी ता. ३ ते ५ हे दिवस नोकरी- व्यावसायिक पार्श्वभूमीवर उत्तम. श्रवण नक्षत्रास सरकारी माध्यमातून लाभ. कोर्ट विषयक कामांतून यश. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार हरवाहरवीचा.

वास्तू खरेदीतल्या अडचणी दूर होतील

कुंभ : एक ऊर्जासंपन्न सप्ताह राहील. तरुणांना उत्तम नोकरीच्या संधी मिळतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सुवार्ता देईल. नोकरीत मानांकन मिळेल. वास्तू खरेदीतील अडचणी जातील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरतील.

ओळखीतून नोकरी मिळेल

मीन : सप्ताहातील मार्गी होणारा गुरू शुक्रभ्रमणाला मोठा वाव देईल. सभासंमेलने गाजवाल. सेलिब्रेटींचा सहवास घडेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखींतून नोकरी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ चा मार्गशीर्षातला गुरुवार जीवनाला उत्तम दिशा देईल. अर्थातच नोकरी-व्यावसायिक स्थैर्य वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT