bigg boss marathi 4 theme house contestant host sakal
bigg boss marathi 4 : ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकच उत्सुकता आहे. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. हा शो काही दिवसांवर आल्याने आता नेमके कोणते कलाकार स्पर्धेत सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. शिवाय यंदाचे घर कसे, कोणती थीम असेल याविषयीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. त्याविषयी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (bigg boss marathi 4 theme house contestant host )
'इथं दिसतं तसंच असतं' म्हणत सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात एक मराठमोळा वाडा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामध्ये तिथे असलेली नथ हा आकर्षणाचा विषय ठरला होता. तुळशी वृंदावर, शाही सोफे, साडीच्या जरीदार कपड्यांचा सुबक वापर असे हे घर होते. 'ये तो पब्लिक हे सब जानती है' म्हणत बिग बॉस चे दुसरे पर्व ही आले. या पर्वात आणखी दर्जेदार गोष्टी पाहायला मिळाल्या. मुलींच्या रूम मध्ये असलेले घुंगरु, बाथरूम मधील बांगड्या, किचन मधील लिंबाचे झाड, आकर्षक लिविंग रूम असे हे घर होते. बिग बॉस च्या तिसऱ्या पर्वात 'अनलॉक एंटरटेनमेंट' हि थीम घेऊन अत्यंत आकर्षक घर समोर आले. यावेळी घराच्या दाराशीच एक मोठे कंगन होते. शिवाय गार्डन, जेल आणि त्यामध्ये उद्या असलेल्या आकर्षक पद्धतीने उभारलेली गाडी, झुंबराला दिलेली कानातल्या झुमक्यांची डिझाईन, डायनींग टेबल, एका भिंतीवर अजरामर नाटकांची केलेली कॅलीग्राफी असे हे डोळे दिपवणारे घर होते.
आता उत्सुकता आहे ती चौथ्या पर्वात बिग बॉस चे घर कसे असेल याची. यंदाच्या 'बिग बॉस' च्या घराचा लुक अजून रिव्हील झाला नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार यंदाचे घर हे आपल्या प्रत्येकाला खूपच जवळचे वाटेल असे असणार आहे. आपला स्वभाव, आपलं वागणं, इमोशन्स या सगळ्याचे प्रतीक घराच्या डिझाईन मध्ये दिसणार आहे. याशिवाय घरी बसून 'बिग बॉस' पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात त्या घराविषयी असलेल्या भावना, स्पर्धकांचे विचार, आचरण या सगळ्याचा विचार करून हे घर तयार करण्यात आले आहे. लवकरच या घराचा पहिला लुक समोर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.