Hansika Motwani Wedding Esakal
फोटोग्राफी

Hansika Motwani Wedding: शुभमंगल सावधान! हंसिकाच्या लग्नाचे काही खास क्षण..

सकाळ डिजिटल टीम

Hansika Motwani Wedding: बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा सुरू होती ते अखेर पार पडलं. अभिनेत्री हंसिका मोटवानी आपला बॉयफ्रेंड सोहेल कथूरियाशी लग्नबंधनात अडकली. ४ डिसेंबरला हंसिकानं जयपूर येथील मुंडोता फोर्टमध्ये सोहेल सोबत सात फेरे घेतले. नवरीच्या थाटात संजलेल्या हंसिकाचे लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत.

आपल्या लग्नात हंसिका खूपच सुंदर दिसत होती. नखशिखांत सजलेल्या हंसिकाचा साजशृंगार पाहण्यासारखा आहे. लग्नात हंसिका मोटवानीने लाल रंगाचा लेहेंंगा परिधान केलेला आहे.तर सोहेल कथुरिया शेरवानीत दिसला.
मीडिल पार्टेड हेअर आणि सटल मेकअप यामुळे हंसिकाचं सौंदर्य अजून खुलून आलं आहे. मांगटिका आणि नाकात नथ घालत हंसिकानं ब्राइडल लूक पूर्ण केला होता.
गेल्या आठवडाभरापासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सर्व फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मेंहदी आणि संगीत कार्यक्रमात ती खूप सुंदर होती.तिच्या मित्र मंडळीसोबत तिने फोटो काढले आहेत.
याआधी हंसिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.
हंसिकाच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. सोहेलने हंसिकाला पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रपोज केलं होतं,ज्याचे सुंदर फोटो तिनं इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT