Charmy Kaur Birthday esakal
फोटोग्राफी

पंजाबची चार्मी कौर साऊथ इंडस्ट्रीची अशी बनली सुपरस्टार?

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चार्मी कौर ही आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

धनश्री ओतारी

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चार्मी कौर ही आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती तेलगू सिनेमांसोबतच काही तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते.

चार्मी कौर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असून ती केवळ अभिनेत्रीच नाही तर निर्माती देखील आहे. ती तेलगू सिनेमांसोबतच काही तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते. आज ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
चार्मीचा जन्म 17 मे 1987 मध्ये लुधियाना येथे एका शीख कुटूंबात झाला. मात्र, चित्रपटात काम करण्याच्या आवडीमुळे ती पंजाब सोडून थेट दक्षीण सिनेसृष्टीत पोहचली. आणि साऊथ चित्रपटामध्ये तिनं आपले वर्चस्व गाजवले आहे. तिने आत्तापर्यंत 40 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'मास' (2004), 'अनुकोकुंदा ओका रोजू' (2005), 'लक्ष्मी' (2006), 'पौर्नामी' (2006), आणि 'राखी' (2006) हे तिचं गाजलेले चित्रपट आहेत. मात्र तिनं आता अभिनय क्षेत्रातून एक्झीट घेत निर्मात्यांच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
चार्मी कौरने 2002 मध्ये तेलगु फिल्म 'नी तोडू कावली' चित्रपटातून पदार्पण केले आहे. यामध्ये तिनं एका गृहिणीची भूमिका बजावली. यानंतर तिनं तमिळमध्ये टी. राजेंद्र यांच्या कधल अझीवथिल्लई या चित्रपटात दिसली. यामध्ये ती सिलम्बरासनसोबत पाहायला मिळाली.
2002 तिने मळ्याळम फिल्म 'कट्टूचेमबकम' मध्ये अभिनय केला. हा तिचा पहिला हिट चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मळ्याळम विनयनने केला आहे. यानंतर ती 2007 मध्ये 'मंत्रा' मध्ये दिसली. या चित्रपटासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून राज्य नंदी पुरस्कार जाहिर करण्यात आला. ज्यासाठी तिला आणखी एक राज्य नंदी स्पेशल जूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दक्षिणमध्ये आपले वर्चस्व गाजवल्यानंतर तिनं आपला मोर्चा हिंदी चित्रपटाकडे वळवला. 2011 मध्ये 'बुड्ढा होगा तेरा बाप' चित्रपटामधून पदार्पण केलं. ज्यामळे बिग बी अमिताभ बच्चनदेखील होते. त्यानंतर ती 'जिला गाजियाबाद', 'आर राजकुमार' याचित्रपटांमध्ये काम केलं आहे. तलेच काजल अग्रवाल सह अनेक अभिनेत्रींचे तेलगू डबिंगदेखील तिनं केलं आहे.
चार्मीने केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर निर्मितीच्या जगातही तिनं स्वतःला सिद्ध केलं आहे. 2015 मध्ये 'ज्योती लक्ष्मी' या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीच्या दुनियेत पदार्पण केले. यानंतर 2017 मध्ये पुरी कनेक्ट्ससोबत 'रोग', 'पैसा वसूल' (2017), 'मेहबूबा' (2018), 'स्मार्ट शंकर' (2019), 'रोमँटिक' (2021) हे सिनेमे बनवले.
2021 मध्ये, चार्मीने पुरी जगन्नाध यांच्या दिग्दर्शनाखाली तेलुगू-हिंदी चित्रपट 'लाइगर' निर्मीत केला, जो या वर्षी 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. पुरी कनेक्ट्स आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या सहकार्याने त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
याशिवाय चार्मी सध्या तिच्या आगामी 'जेजीएम' चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये येईल आणि तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल. अभिनेत्री म्हणून ती शेवटची '10 एर्दकुल' चित्रपटात काम करताना दिसली होती. तेव्हापासून तो चित्रपट निर्मितीच्या दुनियेत आहे. ती पुरी कनेक्ट प्रॉडक्शन हाऊसची सह-संस्थापक देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT