जर तुम्हाला युरोप फिरण्याची खूप इच्छा आहे. मात्र बजेट बसत नसेल तर तुम्ही कुर्गचा विचार करु शकता. ते कोणत्याही बाबत युरोपातील थंडहवेच्या ठिकाणांच्या तुलनेत कमी नाही. त्यामुळे त्यास भारताचे स्काॅटलंड म्हटले जाते. कर्नाटकच्या पश्चित घाटात वसलेल्या या थंडहवेच्या ठिकाणाला प्रत्येक वर्षी लाखो देश-विदेशी पर्यटक भेट देतात. आम्ही तुम्हाला कुर्गची काही अप्रतिम झलक छायाचित्रांमधून दाखवणार आहोत...
कोडगू अधिकृत नाव : कुर्गचे अधिकृत नाव कोडगू असे आहे. हे ठिकाण देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पर्वतांच्या खुशीत वसलेला हिरवळीने नटलेल्या हा भाग आऊटडोर डेस्टिनेशनसाठी सर्वोत्तम आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, मासेमारी आणि वाॅटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.मान्सूनमध्ये निसर्ग सौंदर्य बहरते : कर्नाटकमध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले ठिकाण म्हणजे कुर्ग. त्यामुळे तुम्हाला येथे शहरी वातावरणापासून सुटका मिळेल. सर्वाधिक पाऊस : भारताच्या या भागात सर्वाधिक उत्पादन काॅफीचे घेतले जाते. तसेच या भागात सर्वाधिक पाऊस पडतो.अनेक पर्यटनस्थळे : कुर्गमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. त्यात भगमंडला, तालकावेरी, निसर्ग धाम, दुबेरे, अब्बे धबधबा, इरुप्पू धबधबा आणि नागरहोल नॅशनल पार्क आदींचा समावेश होतो. पुष्पगिरी आणि बह्मगिरी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे यास भारताचे स्काॅटलंडही म्हटले जाते.
सहज जाते येते : सुट्यांसाठी सर्वोत्तम ठिकाण असणाऱ्या या ठिकाणी विमान, रेल्वे आणि वाहनाने सहज पोहोचता येते. कुर्गपासून सर्वात जवळ मंगळूर विमानतळ आहे. ते १६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच बंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळ ते २६५ किलोमीटर अंतरावर आहे.
विमानाने कसे पोहोचावे कुर्गला? :
देशातील सर्वात मोठ्या शहरांमधून बंगळूरु आणि मंगळूर विमानासाठी स्पाईसजेट, इंडिगो, एअर इंडिया आदींची विमानसेवा मिळू शकते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद सारख्या शहरांमधून या विमानतळासाठी थेट विमानसेवा आहे. रेल्वेने कसे पोहोचावे कुर्ग? :
तुम्ही कर्नाटकच्या म्हैसूरपर्यंत रेल्वेने जाऊ शकता. म्हैसूर रेल्वेस्थानक कुर्गपासून सर्वात जवळ आहे. दोन्हींमधील अंतर ९५ किलोमीटर इतके आहे. म्हैसूर रेल्वेस्थानक देशाच्या जवळपास सर्व मोठ्या स्थानकांशी जोडले गेले आहे. म्हैसूर व्यतिरिक्त मंगळूर रेल्वेस्थानकापर्यंत तुम्ही रेल्वेने जाऊ शकता.
रस्ता मार्गानेही जाऊ शकता : रस्त्यांचे सौंदर्य आणि वाहन चालविण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला बंगळूरुपासून वाहन चालवत कुर्गला जायला साडेचार तास लागेल. जर तुम्हाला वाहन चालवण्याची इच्छा नसेल तर बंगळूरु, म्हैसूर आणि मंगळुरतून थेट कुर्गपर्यंत बसही मिळू शकते.
साहसी क्रीडा प्रकाराचा आनंद : जर तुम्ही रोमांचचे शौकीन असाल तर कुर्गमध्ये तुमच्यासाठी पूर्ण व्यवस्था आहे. तुम्ही ट्रॅकिंग किंवा गिऱ्हारोहणचा आनंद घेऊ शकता. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.