दिव्या भारती
दिव्या भारती सकाळ डिजिटल टीम
फोटोग्राफी

दिव्या भारतीबद्दलची 'ती' गोष्ट अंगावर शहारे आणणारी

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्ये दिव्या भारती एक असा चेहरा होता जी ने अत्यंत कमी काळात रसिकांच्या मनावर छाप सोडली. दिव्या भारतीचे करिअर अत्यंत अल्प राहिले. करिअरच्या पहिल्याच वर्षी बाराही चित्रपट जबरदस्त हिट दिल्यानंतर तिचा दुसऱ्याच वर्षी तिचा गुढ मृत्यू झाला.

25 फेब्रुवारी 1974 ला दिव्या भारतीचा जन्म झाला होता. मात्र अवघ्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वर्षांमध्ये दिव्याने चांगली ओळख प्राप्त केली होती. 5 एप्रिल 1993 ह्या दिवशी तिने तिच्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे 1993 मध्ये दिव्याचे फक्त तीनच चित्रपट प्रदर्शित होऊ शकले, त्यामध्ये क्षत्रिय, रंग आणि शतरंज या चित्रपटांचा समावेश होता.
“शोला और शबनम” या चित्रपटाची शूटिंग दरम्यान तीची ओळख साजिद नाडियादवाला सोबत झाली होती. या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले होते, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 10 मे 1992 ला त्यांचे लग्न झाले. 5 एप्रिल 1993 रोजी घराच्या बाल्कनीमधून पडून दिव्या यांचा मृत्यू झाला होता. दिव्याच्या मृत्यूमागे साजिद यांचाच हात असल्याचेही बोलले जात होते. मात्र पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचं स्पष्ट केलं. दिव्या भारती यांच्या अशा अचानक झालेल्या निधनानं बॉलिवूडला सर्वात मोठा धक्का बसला होता आणि तेव्हा पासून आज 29 वर्षांनंतरही दिव्या भारती यांचा मृत्यू सर्वांसाठी एक मिस्ट्री होऊन राहिला आहे
यानंतर साजिदनेच दिव्याच्या आई-वडिलांना सांभाळलं. दिव्याचे वडील ओम प्रकाश यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत साजिद त्यांच्यासोबत होता. आता दिव्या आणि ओम प्रकाश हे दोघेही या जगात नाहीत, त्यामुळे साजिदच आता दिव्याच्या आईची काळजी घेतात.
भारतीने तिच्या छोट्या कारकीर्दीत १४ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि तिच्या मृत्यूच्या वेळी ती सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या ऑफस्क्रीन व्यक्तिमत्त्वाची आणि अद्वितीय अभिनय क्षमतेची तिच्या अनेक सहकलाकारांनी आणि समीक्षकांनी खूप प्रशंसा केली आणि आठवण करून दिली. 
लग्नाच्या एका वर्षातच दिव्या भारतीचा मृत्यू झाला आणि दिव्याच्या मृत्यूने अनेक गुपिते मागे सोडली. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर तिचे 'रंग' आणि 'शतरंज' हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटात त्याची को-स्टार आयशा जुल्का हिने एका मुलाखतीत दिव्याच्या मृत्यूनंतरचा एक विचित्र किस्सा सांगितला. काही महिन्यांनंतर सर्वजण 'रंग' चित्रपटाची ट्रायल पाहण्यासाठी फिल्मसिटीत गेले, तेव्हा दिव्या भारतीचा सीन पडद्यावर येताच अचानक पडदा पडला. त्यावेळी या विचित्र घटनेने सगळेच घाबरले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT