Seoul Halloween Festival esakal
दक्षिण कोरियाची (South Korea) राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री उशिरा हॅलोविन उत्सवादरम्यान (Seoul Halloween Festival) चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत.यापैकी अनेकांना हृदयविकाराचा झटका आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्सवादरम्यान लाखो लोक अरुंद रस्त्यावर आले होते, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती.गर्दीत चिरडून अनेकांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेनंतर देशात राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितलं की, इटावान लेसर जिल्ह्यातील एका अरुंद रस्त्यावर गर्दी जमल्याने ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढू शकतो. काहींना हृदयविकाराचा झटका आला आहे.आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुमारे 81 जणांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या सर्व लोकांना सीपीआर देण्यात आला. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच येओल यांनी उत्सवाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगण्यात आलं आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.