bollywoods movies memorable hugging scenes  google
फोटोग्राफी

मिठी कशी मारावी? 5 चित्रपटांतून घ्या कडकडीत 'ग्यान'

अनेक ऑन स्क्रीन जोडप्यांनी चित्रपटांमध्ये याचे सुंदर सीन्स दिलेले आहेत. ते बघून रोमान्सला एक वेगळा अर्थ मिळतो

सकाळ डिजिटल टीम

सध्या अनेक कपल्सचे व्हॅलेंटाईन वीकचे सेलिब्रेशन उत्साहाने सुरू आहे. अनेक लोकं हा काळ आपल्या प्रियजनांबरोबर घालवत आहेत. गेली ४ दिवस कपल्सनी विविध दिवस साजरे केले. उद्या १२ फेब्रुवारीला हग डे आहे. एक घट्ट मिठी तुमच्यातला स्नेह किती घट्ट आहे याचा जाणीव करून देते. मिठीतून प्रेम (Love)आणि काळजीही दिसते. बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांतून प्रेम व्यक्त करण्यासाठी मिठीचे महत्व किती मोठे हे ते सांगितले आहे. अनेक ऑन स्क्रीन जोडप्यांनी चित्रपटांमध्ये याचे सुंदर सीन्स दिलेले आहेत. ते बघून रोमान्सला एक वेगळा अर्थ मिळतो. त्यामुळे तुम्हीही यावर्षी हग डे साजरा करताना बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध चित्रपटांपासून प्रेरणा घ्या. कदाचित असे केल्याने तुमचा दिवस आणखी चांगला जाऊ शकतो.

दिलवाले दुल्हनिया ले जाऐगे- शाहरूख खान- काजोल प्रमुख भूमिकेत असलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐगे' चित्रपटामधील राज- सिमरनच्या जोडीने अनेकांना वेड लावले. पंजाबच्या मोहरीच्या शेतातील त्यांच्या मिठीच्या दृश्याने अनेकांची मने जिंकली. मेंडोलिनचा आवाज, शाहरूख आणि काजोलचे हावभाव यांनी अनेकांना वेड लावले होते. त्या मिठीतून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.
विर जारा - शाहरूख खान, प्रिती झिंटा प्रमुख भूमिकेत असलेल्या 'विर जारा' चित्रपटातील दृष्येही अनेकांना आवडली. रोमान्सचा बादशहा शाहरूख अर्थात वीर हा आपली प्रेयसी जारा ला भेटण्यासाठी पाकिस्तानात येतो. त्याला बघून जारा त्याला घट्ट मिठी मारते. झाराची मिठी ही वीरसाठी जग आहे कारण ती त्याच्यावर किती प्रेम करते हे त्यातून दिसते. मिठी हे प्रेम आणि आपुलकीचे परिपूर्ण उदाहरण का आहे हे या दृष्याने दिसून येते.
रॉकस्टार - रणबीर कपूर, नर्गिस फाक्री प्रमुख भूमिकेत असलेल्या रॉकस्टार चित्रपट तरूणाईला आवडला. या चित्रपटात हीर जॉर्डनच्या प्रेमात वेडी झाली आहे. दोघांमधील जवळीक किती तीव्र आहे हे शोधण्यासाठी ती त्याला घट्ट आणि खूप वेळासाठी मिठी मारण्यास सांगते. तुम्हालाही मिठी मारून एकमेकांविषयी सुरक्षित वाटतंय का? तुमचे प्रेम गहिरे आहे का ते बघण्यासाठी अशी मिठी मारून बघता येईल.
जब वी मेट- शाहीद कपूर, करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जब वी मेट' चित्रपटाने प्रेमाची भाषा बदलली. खरं तर या चित्रपटानंतर करीनाचे शाहीदबरोबर ब्रेकअप झाले. पण चित्रपटाबाबात बोलायचे झाले तर,गीतने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला केलेला विनोदी फोन कॉल आणि त्यानंतर आदित्य आणि गीत यांच्यातील उत्कट मिठी. या सीनमध्ये दोघांची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येते.
ये जवानी है दिवानी - रणबीर कपूर. दिपीका पादुकोण प्रमुख भूमिकेत असलेल्या 'ये जवानी है दिवानी' चित्रपटातील दृष्ये पाहून तुम्हालाही असाच व्हेलेंन्टाईन डे साजरा करावासा वाटेल. प्रेमात प्रेमात पडण्यापासून, वेगळे होण्यापासून आणि कायमचे पुन्हा एकत्र येण्यापर्यंत, अशा प्रवासात दोघेही चित्रपटाच्या शेवटी भेटून एकमेकांना दीर्घ मिठी मारतात. बनी शेवटी नैनाला प्रपोज करतो . त्यांच्यातील कॅमिस्ट्री फारच सुरेख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT