Kangana Ranaut spends 'much-needed break' on picnic with family shares pics  sakal
फोटोग्राफी

Photo : धाकड गर्ल कंगनाचा 'पिकनिक' मूड.. कुटुंबासोबत शेअर केले खास फोटो

अभिनेत्री कंगना रणौत सध्या सुट्टी एन्जाॅय करत असून हिमाचलच्या डोंगरात रमली आहे.

नीलेश अडसूळ

kangana ranaut : बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. यावेळी कंगना वेगळ्याच मूड मध्ये आहे. नुकतेच तिने आपल्या हिमाचल प्रदेश येथील नव्या घराचे सुंदर फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कामातून विश्रांती गरजेची आहे, असं म्हणत तिने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहे. त्यामुळे एरव्ही इतरांवर निशाणा साधणारी कंगना यंदा अत्यंत आनंदी दिसत आहे .

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'धाकड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
या चित्रपटाच्या अपयशानंतर आता कंगना रणौतने कामातून ब्रेक घेतला आहे. मागील बराच काळ ती चित्रपटांच्या कामात व्यस्त होती. मात्र, आता कंगनाने स्वत:साठी वेळ काढला आहे. सध्या ती कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटत आहे.
कंगना आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच हिमाचल येथे गेली आहे. तिथे तिने एक आकर्षक घर देखील बांधले आहे. या हिमाचल दौऱ्याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
'माझ्या आवडत्या ठिकाणी.. माझ्या कुटुंबासोबत.. हा ब्रेक अत्यंत आवश्यक आहे... आणि इथले वातावरणही सुंदर आहे...' असे कॅप्शन कंगनाने या फोटोंना दिले आहे.
या फोटोंमध्ये कंगना, तिची बहीण रंगोली आणि भाचा पृथ्वीराज एकत्र मिळून धमाल करताना दिसत आहे.
कंगना पूर्णतः या दौऱ्याची मजा घेत असून वेगवेगळ्या पोज देऊन तिने फोटोशूट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT