फोटोग्राफी

प्यार कर... प्रेम करण्याचे हे 5 प्रकार माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

प्रेमात पडलं की सगळं काही छान छान वाटायला लागतं. नातेसंबंधात जसे प्रेम असते तेथे काळजी, विश्वास आणि समजूतदारपणा असतो. हे गुण अनुभवातून आणखी वाढत जातात. तुम्ही असे प्रेम शोधले पाहिजे जे तुम्हाला संतुष्ट करते. प्रेमातून तुम्हाला नेमके काय अपेक्षित आहे, हे समजून घेणेही गरजेचे आहे. लोकं पाच प्रकारे आपले प्रेम व्यक्त करत असतात.

शारिरिक प्रेम - तुम्ही एकमेकांना केलेला जिव्हाळ्याचा स्पर्श हा एकमेकांप्रती प्रेम आणि आकर्षण व्यक्त करतो. तुमच्या प्रिय व्यक्तीने केलेल्या स्पर्शामुळे तुम्हाला पार्टनरविषयी जवळीक आणि आपुलकी वाटते. तिचं तुमच्या जवळ असण्याने एक सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे असते. ती व्यक्ती तुम्हाला प्रेम, आपुलकीने आणि कामभावनेने स्पर्श करू शकते. तो स्पर्श तुम्हाला हवाहवासा असतो.
भावनिक प्रेम - तुमच्या सगळ्या भावना इथेच गुंतलेल्या असतात. प्रेम ही एक अनुभवण्यासारखी गोष्ट असून त्यात तुम्हाला आनंद, दुख, समजूतदारपणा अशा सगळ्या भावना मिळू शकतात. तुमच्या तन, मन, आत्म्याला व्यापून टाकणारे प्रेम तुम्हाला जोडीदाराकडून अपेक्षित असते. त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न करता.
मानसिक प्रेम - इथे तुम्ही हृदयाचं एेकण्यापेक्षा डोक्याने विचार करून प्रेम करण्याला जास्त महत्व देता. अशा प्रकारचे प्रेम करताना प्रत्येक भावना आणि कृतीचा तार्किक विचार करायला लावते. तुम्ही जोडीदाराच्या कृतीचे विश्लेषण करता. त्यावरून इतर भावनांचा विचार करून नेमकं काय अपेक्षित आहे त्यानुसार त्या पद्धतीने वागण्याला महत्व देता.
अध्यात्मिक प्रेम- जेव्हा आध्यात्मिक प्रेमाचा विचार केला जातो तेव्हा सार्वत्रिक बंध, दोघांमधली केमिस्ट्री आणि लोकांमधील संबंध खरोखरच खूप अर्थपूर्ण असतात. यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून वेगळी मिळते. त्याचे तुम्हाला आकर्षण वाटते. हाच आध्यात्मिक संबंध आणि प्रेमाचा आधार आहे.
संयम आवश्यक- विश्वास, प्रेम आणि समजून घेतल्याशिवाय प्रेम यशस्वी होऊ शकत नाही. नातेसंबंध जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात संयम, समज आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो. प्रेम मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असणे गरजेचे आहे. तरच सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येईल. तुमच्या प्रेमावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT