Sarpanch Chhavi Rajawat esakal
आपण अशा जगात राहतोय जिथे लोक गाव सोडून शहराकडे वेगाने वळताहेत. त्याचबरोबर लाखोंच्या नोकऱ्या आणि ऐषोआरामाचे जीवन सोडून गावकऱ्यांना आपले जीवन अर्पण करणारी काही उदाहरणे आपल्या आजुबाजूला आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे राजस्थानच्या (Rajasthan) टोंक जिल्ह्यातील सोडा पंचायतीची सरपंच छवी राजावत (Sarpanch Chhavi Rajawat).
छवी राजावत या राजस्थानच्या पहिल्या एमबीए सरपंच आहेत. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावात १९८० मध्ये जन्मलेल्या राजावत यांनी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमधून एमबीए केले. सुमारे सात वर्षे त्यांनी दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) आणि जयपूरमधील अनेक कंपन्यांमध्ये काम केले. एकदा छवी त्यांच्या गावी गेल्या आणि गावकऱ्यांनी त्यांना सरपंचपदाची निवडणूक लढवण्यास सांगितले. महानगराच्या जीवनप्रेमी प्रतिमेमुळे गाव आणि कुटुंबाच्या आग्रहाखातर त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनी सोडली आणि निवडणुकीत ते उतरल्या. 2010 ला त्या निवडणुकीत विजयी झाल्या आणि यासह त्यांनी नवा रिकार्ड आपल्या नावावर केला.गावातील सरपंच झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा छवीसमोर पाण्याची समस्या आली. या समस्येवर मात करण्यासाठी छवीने मित्र परिवाराच्या सहकार्यातून अवघ्या चार दिवसांत २० लाख रुपये जमा करून गावात तळे बांधले. आज गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.छवी यांना सोडा या गावात बाईसा या नावाने ओळखले जाते. सरपंचपद भूषविणाऱ्या त्या सर्वात लहान व्यक्ती आहेत. त्यांचे आजोबा ब्रिगेडियर रघुबीर सिंग यांनीही निवडणूक जिंकण्यापूर्वी २० वर्षे याच गावचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.