Mahatma Phule Death anniversary Esakal
फोटोग्राफी

Mahatma Phule Death Anniversary: महात्मा फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण घटना...

स्त्री शिक्षासासोबत अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी आणि उद्धारासाठी महात्मा फुले यांनी काम केल.

सकाळ डिजिटल टीम

9ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रुढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी 1851 मध्ये मुलींसाठी शाळा सुरु केली. 5 हजार वर्षांच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती. त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरीता शाळा सुरु केली. अस्पृश्य स्त्रियांकरीता त्यांनी 6 शाळा चालविल्या.  11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांनी या जगाला निरोप दिला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया महात्मा फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण घटना...

एक जानेवारी 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले या मुलींच्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांच्यासह फातिमा शेख यांनीदेखील मुलींच्या शिक्षणात वाटा उचलला. महात्मा फुले यांनी 1882 मध्ये हंटर आयोगाकडे सर्वांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली.
समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यावर भाष्य करणारे 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहीला. समाज प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीसाठी हा महत्त्वाचा ग्रंथ ठरला. महात्मा फुले यांनी विधवांच्या हक्कासाठी संघर्ष केला. 1860 मध्ये विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आणि 1865 मध्ये विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्याआधी त्यांनी 1864 मध्ये विधवा विवाह घडवून आणला.
महात्मा जोतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक विषमता नष्ट करणे, सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे आदी सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. वर्णव्यवस्थेला आणि वेदांना झुगारत सत्यशोधक समाजाने काम सुरू केले.
स्त्री शिक्षासासोबत अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी आणि उद्धारासाठी महात्मा फुले यांनी काम केल. महात्मा फुले यांनी विविध ग्रंथांचं लेखन देखील केलं आहे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादि काव्यरचना, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, हंटर शिक्षण आयोगापुढं सादर केलेल निवेदन, इशारा आणि तृतीयरत्न नाटक या पुस्तकांचं लेखन महात्मा फुले यांनी केलं.
भारतातील पहिली कामगार संघटना 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. त्यांना कामगार संघटना स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुले यांनी 1875 मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात खतफोडीचे बंड घडवून आणले.1888 मध्ये मुंबईत जोतीराव फुले यांचा रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि महात्मा ही पदवी देण्यात आली.
जोतिबा फुले यांनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत होणाऱ्या कर्मकांडाची चिकित्सा केली. यात एकूण 28 विषयांवर तपशीलाने मांडणी केली. यातील एक विषय म्हणजे लग्न. याच लग्न प्रकरणात त्यांनी सत्यशोधक विवाहाबाबतची त्यांची भूमिका मांडली. गणपतराव आणि जोतीराव या दोघांमधील संवादाच्या स्वरुपातील या मांडणीत लग्न म्हणजे काय इथंपासून तर लग्न ठरवताना कोणते गूण पाहावेत इथपर्यंत फुलेंनी मांडणी केली.
शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT