Hruta Durgule Wedding Photo sakal
फोटोग्राफी

PHOTO : हृता दुर्गुळे झाली 'मिसेस शाह'.. पाहा लग्नाचा शाही थाट

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने बुधवारी प्रतीक शाह सोबत लग्नगाठ बांधली.

नीलेश अडसूळ

'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि विशेष म्हणजे जिने तरुणांना भुरळ घातली अशी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Marathi Actress Hruta Durgule) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हृतानं डिसेंबर महिन्यात प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. ते बरीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत. साखरपुड्यापासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती. पण बुधवारी हृताने फोटो पोस्ट करत लग्न झाल्याची माहिती दिली. या शाही सोहळ्याचे हे काही खास फोटो.. (Hruta Durgule Wedding Photo)

मराठी टेलिव्हिजन विश्वातील गोंडस अभिनेत्री म्हणून ऋताने (Hruta Durgule Wedding) आपली वेगळी ओळख बनवली आहे. ऋताने प्रतिक शहा सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. यानंतर तिने डिसेंबरमध्ये प्रतिक शहा सोबत साखरपुडा देखिल केला होता. इन्स्टाग्रामवर तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते
हृताने यावेळी संपूर्ण कुटुंब सोबत फॅमिली फोटो देखील काढला आहे. हृता आता 'शाह' परिवाराची सून झाली आहे.
या लग्न सोहळ्याला काही मोजक्याच माणसांनी हजेरी लावली. यावेळी तिच्या आगामी 'अनन्या' सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रताप फड उपस्थित होते.
हे लग्न होणार याबाबत माहिती असली तरी ते कधी होणार हे मात्र शेवटपर्यंत गुपित ठेवण्यात आले. बुधवारी हृताने स्वतः लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला.
या लग्नात अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत आणि मनोरंजन विश्वातील काही मान्यवरांनी हजेरी लावली होती.
प्रतीक शाह हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT