marathi actress priya bapat life story file image
मराठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.18 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईमध्ये प्रियाचा जन्म झाला. शाळेत असल्यापासूनच प्रियाला अभिनयाची आवड निर्माण झाली. बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षण घेत असताना तिने नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करण्यास सुरूवात केली. प्रियाने 2000 साली जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या हिंदी चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तिने रमाबाईची भूमिका साकारली. या चित्रपटातील तिचा अभिनय बॉलिवूडमधील दिग्दर्शकांच्या पसंतीस पडला. त्यानंतर प्रियाला मुन्ना भाई एम बी बी एस या हिंदी चित्रपटामध्ये काम करण्यची संधी मिळाली. प्रियाने अनेक मराठी चित्रपटआणि मालिकामध्ये काम केले आहे. शुभंकरोती, आलटून पालटून, या मालिकामधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'आम्ही ट्रॅव्हल कर' या शोमधून प्रियाने प्रेक्षकांना परदेशातील ठिकाणे दाखवली.प्रियाला शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या चित्रपटाचीही ऑफर मिळाली होती. मात्र शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने तो चित्रपट नाकारला.'आभाळमाया' या मालिकेच्या शूटच्या शेवटच्या दिवशी प्रियाची भेट उमेश कामत या अभिनेत्यासोबत झाली. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेशने 2011 साली लग्न केले. टाईम प्लिज,काकस्परर्श ,मी शिवाजी राजे भोसले या चित्रपटांमध्ये प्रियाने काम केले. काकस्पर्श या चित्रपटातील अभिनयासाठी प्रियाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कर मिळाला. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.