marathi web series ranbazar success party photo sakal
फोटोग्राफी

Photo : प्रेक्षकांच्या टीकेनंतरही 'रानबाजार' हीट.. अशी झाली सक्सेस पार्टी..

‘रानबाजार’ वेब सिरिजची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी झाली यावेळी अनेक तारे तारकांनी हजेरी लावली होती.

नीलेश अडसूळ

ranbazar success party : वेबविश्वाला हादरून सोडणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली. सुरवातीला या वेब सिरिज वर टीका झाली पण नंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले. टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेबसीरिज पाहून, त्याचे भरभरून कौतुक केले. अशा या वेबसीरिजने आपल्या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले. (marathi web series ranbazar success party photo)

'रानबाजार' हीट झालीच शिवाय पार्टीमागे एक खास कारणही होते. ते म्हणजे ‘रानबाजार’चे निर्माते आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही पार्टी ठेवण्यात आली होती.
या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.
'रानबाजार'चे निर्माते अक्षर बर्दापूरकर आणि लेखक दिग्दर्शक अभिजीत पानसे.
अभिनेते सचिन खेडेकरही या पार्टीला उपस्थित होते. त्यांनीही यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका केली आहे.
या वेब सिरिजच्या प्रोमो नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी वर झालेली टीका आपल्याला ठाऊक आहेच. पण नंतर तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. ती देखील या सोहळ्याचा भाग झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Express : कोल्हापूर–मुंबई प्रवासासाठी हक्काची गाडी हरवली; सह्याद्री एक्स्प्रेसच्या विस्तारावर रेल्वेची उदासीन भूमिका

केंद्र सरकारकडून अपेक्षा नाही, ते वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करतायत; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

SBI Interest Rate : SBI चा मोठा निर्णय! FD चे दर बदलले, होम लोन व EMI स्वस्त होणार? नवीन दर पाहा

Mumbai Local Megablock: तिन्ही लोकल मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! सर्व सेवा रद्द पण कोणत्या मार्गावर? जाणून घ्या सविस्तर...

Latest Marathi News Live Update : केडीएमसी प्रभाग आरक्षणावर आक्षेप, रवी पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका

SCROLL FOR NEXT