clothes esakal
फोटोग्राफी

Photos : चिलीच्या वाळवंटात कपड्यांचा डोंगर

सध्या जगातील सर्वात कोरड्या वाळवंट अटाकामामध्ये असा एक पर्वत आहे, जे इतरांपेक्षा वेगळा आहे.

सकाऴ वृत्तसेवा

दक्षिण अमेरिकेतील चिली हा देश त्याच्या सुंदर पर्वतांसाठी ओळखला जातो. येथे 20 हजार फुटांपेक्षा उंच 22 पर्वत आहेत. पण सध्या जगातील सर्वात कोरड्या वाळवंट अटाकामामध्ये असा एक पर्वत आहे, जे इतरांपेक्षा वेगळा आहे. या वाळवंटात टाकून दिलेल्या कपड्यांचा डोंगर आहे. ख्रिसमसच्या स्वेटरपासून ते स्की बूट्सपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे. पण अडचण अशी आहे की, त्यातून नवीन प्रकारचे प्रदूषण पसरत आहे. नवीन प्रकारचा कचरा निर्माण होत आहे. जे सतत वाढत चालला आहे.

चिलीच्या या भागात इतके कपडे आहे की इथले दुकानदार ते विकूही शकत नाहीत. अडचण अशी आहे की आजूबाजूच्या देशांतील लोकांना इथल्या कपड्यांच्या पर्वतांची माहिती आहे. त्यामुळे येथून वाहतूक, साफसफाई आदी खर्च कोणीही भरू इच्छित नाही. बंदरावर काम करणारे माजी कर्मचारी अॅलेक्स कॅरेनो यांनी सांगितले की, या ठिकाणी जगभरातून कापड येते. राजधानी सॅंटियागो किंवा इतर देशांमध्ये जे कपडे विकले जात नाहीत, ते येथेच राहून जातात.
चिलीच्या काही भागात टाकाऊ कपड्यांचा पुनर्वापर केला जातो. येथून रिसायकल केलेले कपडे लाकडी विलगीकरण पॅनल्समध्ये टाकले जातात. जेणेकरून सामाजिक बांधणीच्या इमारतींच्या भिंती ऋतूनुसार थंड व गरम करता येतील. येथे उपस्थित असलेल्या इकोफिब्रा आणि इकोसिटेक्स या दोन कंपन्या कपड्यांचे रीसायकल करतात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे काम करते. जेणेकरून त्यांच्यापासून विविध प्रकारची उत्पादने बनवता येतील.
इकोफिब्राचे संस्थापक फ्रँकलिन झेपेडा म्हणाले की, फॅब्रिक्स (कपडे) बायोडिग्रेडेबल नसतात. पण त्यात रसायने असतात. त्यामुळे महापालिका त्यांना कचरा डेपोत ठेवत नाही. हे कपडे कचरा डेपोत आणू नयेत यासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारने एक सोपा मार्ग शोधला आहे. पण इथेच ते धोका पत्करत आहेत. हे कपडे रिसायकल करून जगभर पाठवल्यास स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि देशाला महसूल मिळेल.
इकोफाइब्रा (EcoFibra) आणि इकोसिटेक्स (Ecocitex) या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या कारखान्यांमध्ये रिसायकल केलेल्या कपड्यांपासून बनवलेल्या नवीन उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्टोअर्स उभारल्या आहेत. म्हणजेच फॅक्टरी आउटलेट. अशा दुकानांची फ्रँचायझी घेऊन रिसायकल केलेल्या वस्तू विकण्याचे कामही काही स्थानिक लोक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

Chh. Sambhajinagar: सिडको खून प्रकरण, पालकमंत्री शिरसाट माघारी फिरताच एकाचे कृत्य; प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की, कानशिलात लगावली

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'बटाटा मटर ब्रेड कचोरी', सोपी आहे रेसिपी

Ajit Pawar: शेतकऱ्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देऊ: उपमुख्यमंत्री अजित पवार; राष्‍ट्रवादीत अनिल देसाई दाखल, साताऱ्याच्या मातीशी आपुलकीची नाळ

Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पूर

SCROLL FOR NEXT