How Hydrogen Fuel Car Work Nitin Gadkari Twitter
नवी दिल्ली : आज देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार धावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानापासून संसदेपर्यंत या कारमधून प्रवास केला. इंधन दरवाढीला हायड्रोजनवर चालणारी कार सर्वोत्तम पर्याय आहे. पण, या कारची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? ते जाणून घेऊयात.
देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधनावरील कारला टोयोटाने बनवले असून या कारचे नाव टोयोटा मिराई आहे. मिराईचा अर्थ भविष्य असा होतो. नितीन गडकरींच्या उपस्थितीत ही कार लाँच करण्यात आली. आज स्वतः गडकरींनी या कारमधून प्रवास केला.ही कार हायड्रोजन सेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करत असून त्यावर कार चालण्यास मदत होते.
टोयोटा मिराईमध्ये एक सिस्टम बसविले असून यामध्ये एक हायड्रोजन फ्युएल टँक आहे. त्यामधून हायड्रोजन निघून फ्युएल सेलसोबत ऑक्सिजनच्या मदतीनं रासायनिक प्रक्रिया होते. त्यामधून वीज तयार होते.हायड्रोजन फ्युएल सेलच्या माध्यमातून तयार झालेल्या इलेक्ट्रीकवर कार चालतेय. कारमधून धूर निघत नाही. त्यामुळे प्रदूषण देखील होत नाही. २ रुपये प्रति किलोमीटर या कारचा खर्च आहे, असं स्वतः गडकरींनी सांगितलं. हायड्रोजन इंधन कारमध्ये भरण्यासाठी जवळपास २-३ मिनिटं लागतात. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी देखील इतकाच वेळ लागतो. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.