फोटोग्राफी

Photos : 'फ्लॅग कोड'मध्ये बदल, आता घरोघरी फडकवता येणार तिरंगा!

सकाळ डिजिटल टीम
भारतीय राष्ट्रध्वजाबाबतच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांबाबत जनजागृती व्हावी यासाठी सरकारनं 'हर घर तिरंगा' ही मोहिमही सुरु केली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या मोहिमेंतर्गत ही मोहिम सुरु करण्यात आली आहे
या नव्या बदलांनुसार, आता राष्ट्रध्वजाबाबतचे कडक नियम शिथील करण्यात आले आहेत. जवळपास याबाबतची बंधन पूर्णपणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळं प्रामुख्यानं केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर घराघरांतही आता राष्ट्रध्वज लावता येणार आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाबाबतच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांबाबत जनजागृती व्हावी यासाठी सरकारनं 'हर घर तिरंगा' ही मोहिमही सुरु केली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या मोहिमेंतर्गत ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
या नव्या बदलांनुसार, आता राष्ट्रध्वजाबाबतचे कडक नियम शिथील करण्यात आले आहेत. जवळपास याबाबतची बंधन पूर्णपणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळं प्रामुख्यानं केवळ ऑफिसमध्येच नव्हे तर घराघरांतही आता राष्ट्रध्वज लावता येणार आहे.
नव्या नियमावलीनुसार, राष्ट्रध्वज बनवण्यासाठी आता सर्व प्रकारचं कापडी मटेरिअल वापरता येणार आहे. यामध्ये पॉलिस्टर, कापड, लोकर, सिल्क आणि खादीच्या कापडांचा समावेश असेल. यापूर्वी मशीनवर तयार केलेले आणि पॉलिस्टरचे झेंडे वापरास बंदी होती. त्याचबरोबर आता झेंड्याच्या साईजबाबतही कोणतेही निर्बंध नसतील. तसेच झेंडा कोणत्या वेळेत फडकावयाचा यावरही निर्बंध नसतील.
यापूर्वी राष्ट्रध्वज केवळ सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीच फडकवता यायचे, तेही विशिष्ट हवामानातच. तसेच सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था यांनाच केवळ दररोज राष्ट्रध्वज फडकवण्यास परवानगी होती. तर इतरांना केवळ राष्ट्रीय सणांनाच राष्ट्रध्वज फडकावता येत असे. पण आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
या निर्णयाबाबत संस्कृती मंत्रालयानं म्हटलं की, राज्यांनी राष्ट्रध्वजांच्या निर्मितीसाठी स्वयंसहाय्यत गट निर्माण करावेत. तसेच स्थानिक टेलरिंग युनिट्सचा हे राष्ट्रध्वज तयार करण्याच्या कामात वापर व्हावा. तसेच लघु उद्योगांनाही याकामात सामावून घेतलं जावं असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
त्याचबरोबर कापड मंत्रालय हे मोठ्या प्रमाणावरील राष्ट्रध्वज पुरवठादार म्हणून ओळखलं जाईल. त्याचबरोबर देशभरातील १.६ लाख पोस्ट कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असतील.
दरम्यान, हर घर तिरंगा ही मोहिम याचसाठी हाती घेण्यात आली आहे की, ज्यामुळं नागरिकांना आपापल्या घरांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट या काळात राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रेरणा मिळेल. या तीन दिवसांच्या काळात सुमारे २० कोटी राष्ट्रध्वज घरांवरती फडकावले जातील असा अंदाजही सरकारनं अधिकृतरित्या वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT