Priyanka Mangesh Mohite esakal
साहसी खेळात प्रियांकाने दिलेल्या योगदानाची दखल राज्य शासनानेदेखील घेतली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून सातारा येथे परतलेल्या प्रियांका मंगेश मोहितेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. याठिकाणी प्रियांका यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर तिची सातारा शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. सातारा येथे राहणाऱ्या प्रियांका मंगेश मोहिते (Priyanka Mangesh Mohite) यांनी विविध गिर्यारोहण मोहिमा यशस्वीपणे राबविल्या असून, सर्वात कमी वयाच्या गिर्यारोहक म्हणून त्यांच्या कार्याची नोंद आहे. साहसी खेळात प्रियांकाने दिलेल्या योगदानाची दखल राज्य शासनानेदेखील घेतली आहे. गिर्यारोहण प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रियांकाला केंद्र सरकारने तेनसिंग नॉर्गे साहस पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Award) जाहीर केला होता. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते तिने (ता. १३) स्वीकारला.पुरस्कार स्वीकारून प्रियांका ही साताऱ्यात परतली. या वेळी तिच्या स्वागताचे नियोजन साताऱ्यातील विविध संघटना, क्रीडाप्रेमींनी केले होते. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात आल्यानंतर प्रियांकाचे जंगी स्वागत करण्यात आले.त्यानंतर प्रियांका यांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. या वेळी नगरसेवक अमोल मोहिते, अभय फडतरे, रोहन गुजर व इतर मान्यवर उपस्थित होते.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमोल मोहिते, फिरोज पठाण यांच्यासमवेत प्रियांकाची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.