Maharashtra Monsoon Rain LIVE : आज पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरु आहे. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्यातील काही भांगात अजूनही पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (Rain Update Mumbai Today)
मंबईतील काही भागांत पावसाने रिमझिम सुरु केल्याने काही दिवसांत पाऊस राज्यभर पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या अखेरीस मान्सून राज्यात सक्रिय होईल असा अंदाज वर्तवला होता.मुंबईतील दादर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय मुंबईतील इतर ठिकाणीही पावसाने एंट्री सुरु केली आहे.पालघर जिल्ह्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण असून, किनारपट्टीच्या काही भागात पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे.मुंबईतील ठाण्यात मात्र जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असणाऱ्या ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चेंबूरच्या आरसीएफ न्यू भारतनगर या डोंगराळ झोपडपट्टीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. एक भला मोठा दगड एका झोपडीवर कोसळला आहे. यात दोघे जखमी झाले आहे.पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करत आहेत. याशिवाय मुंबईतील काही भागांत पावसाची रिपरिप सुरु आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.