Women Fashion esakal
फोटोग्राफी

Women Fashion : महिलांनो खरेदीसाठी जाण्याआधी मराठमोळ्या अभिनेत्रींच्या या हटके साड्या बघूनच जा

संक्रांतीच्या निमित्ताने महिला सजून घराबाहेर पडतात. तेव्हा त्यासाठी आजच साड्यांचे हे प्रकार बघून ठेवत खरेदी करा

साक्षी राऊत

संक्रातीला नेमके दोन तीन दिवस उरलेत. संक्रांतीच्या निमित्ताने महिला नटून थटून एकमेकींच्याय घरी जातात. यावेळी आपल्याला इतर बायकांपेक्षा कसं छान दिसता येईल तसेच माझी साडी इतरांपेक्षा कशी छान दिसेल असेही महिलांना वाटते. तेव्हा खरेदीसाठी बाहेर पडताना तुम्ही एक नजर या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या साड्यांवर टाकायलाच हवी.

प्राजक्ताच्या या साडीची भूरळ कोणालाही पडेल अशी ती आहे. या पॅटर्नमधली साडी संक्रांतीच्या सणांमध्ये तुम्ही सहज घालू शकता. तसेच प्राजक्ताने घातलेली गोल्डन ज्वेलरीदेखील साडीवर उठून दिसतेय. ही साडी तुमच्या सौंदर्याची शोभा आणखी वाढवेल.
मराठमोळी अभिनेत्री अमृताची ही गुलाबी साडी बघून तुम्हालाही ही साडी घेण्याची इच्छा होईल. ही साडी कोणत्याही वर्णावर खुलून दिसेल. तसेच यावर तुम्ही सिल्वर ज्वेलरी किंवा अमृतासारखा सिंपल मेकअप करू शकता.
सईचा क्लासी लूक तुम्हाला हटके दिसण्यास मदत करेल. तुम्हाला अगदी सिंपल लूकमध्ये बाहेर पडायचे असेल तर हे लूक तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल.
सायलीचा पिवळ्या आणि निळ्या साडीतला हा लूक नेटकऱ्यांना फार आवडतो. तुम्हाला असा नाजूक साज करायचा असेल तर तिचा हा साडी पॅटर्न तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.
स्पृहा जोशीचा हा लूक तुमच्या घरी ज्या दिवशी हळदी कुंकु असेल त्या दिवशी अगदी परफेक्ट ऑप्शन ठरेल. तिच्या गळ्यातील मोत्यांची नाजूक माळ, नथ आणि गजरा अगदी छान दिसतोय. अगदी त्याप्रमाणे तुम्हीही हा लूक यासारख्या साडीच्या पॅटर्नसाठी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

प्रार्थना बेहरेचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'सखे गं साजणी' सिनेमाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांना उत्सुकता

SCROLL FOR NEXT