Tollywood Athulya Ravi esakal
गेल्या काही दिवसांपासून जिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे त्या टॉलीवूडच्या अथुल्या रविची जोरदार हवा आहे. तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सॅसी (Social media news) संडे सीरिजमधून तिनं सोशल मीडियावरुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. तमिळ अॅक्ट्रेस असणाऱ्या अथुल्या रविनं तिच्या चाहत्यांना (Entertainment News) घायाळ केलं आहे.
चाहत्यांच्या हजारो कमेंटस आणि लाखो लाईक्सची दाद मिळवणाऱी अथुल्या (Athulyaa Ravi Pics) नेमकी आहे तरी कोण हे आता आपण जाणून घेणार आहोत.
अथुल्या रवि ही एक तमिळ अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये कामही केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून तिनं प्रभावीपणे आपली भूमिका पार पाडली आहे.
अथुल्यानं आपल्या करिअरला सुरुवात शॉर्ट फिल्मपासून केली. तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे नाव पलवाडी लढाई असे होते. त्यानंतर तिला 2017 मध्ये मोठ्या पडद्यावर येण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचे तिनं सोनं केलं आहे. अथुल्या रविनं तिची पहिली भूमिका कधाल कान कट्टूडे मध्ये मिळाली होती. तिच्या त्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यत तिनं दहा चित्रपटांमध्ये काम केले आहे. कथा नयागनमध्ये तिनं सर्पोटिंग अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2018 मध्ये येमालीमध्ये मुख्य भूमिकेत होती. अथुल्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही 2 मिलियनहून अधिक आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची मिळणारी पसंती ही सर्वाधिक असते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.