T20 World Cup Team India Combination May clear in this IPL season
T20 World Cup Team India Combination May clear in this IPL season  esakal
फोटोग्राफी

टीम इंडियाची डोकेदुखी ठरलेले हे 5 प्रश्न IPLमधून सुटणार का?

सकाळ डिजिटल टीम

भारतात विशेषकरून महाराष्ट्रात सध्या आयपीएलच्या 15 व्या हंगामाची (IPL 2022) जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 26 मार्चपासून आयपीएलचे बिगुल वाजेल. दरम्यान, आयपीएल चाहते आपापल्या संघांना खेळाडूंना प्रात्साहन देण्यास सज्ज होत आहेत. तर आयपीएल संघ विजेतेपदाच्या ट्रॉफीपर्यंत पोहचण्याचा मार्ग शोधण्यात व्यग्र आहेत. दुसरीकडे टीम इंडियाच्या (Team India) मॅनेजमेंटची देखील यंदाच्या आयपीएलवर बारीक नजर असणार आहे. कारण याच आयपीएलमधून टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीचा (T20 World Cup) संघ बांधणी करणार आहे. त्यामुळे सध्या टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनबद्दल (Team India Combination) असणाऱ्या या 5 प्रश्नांची उत्तरे संघ व्यवस्थापन शोधण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माचा ओपनिंग जोडीदार कोण? (Rohit Sharma Opening Partner) | भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा टी 20 सामन्यात सलामीला येतो. गेल्या काही वर्षात आपण पाहिले आहे की, रोहित शर्माचा टी 20 मधील सलामीचा जोडीदार सातत्याने बदल आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माबरोबर कोण सलामीला येणार यावर शिक्कामोर्तब होईल. यामध्ये केएल राहुल आणि इशान किशन यांच्यात मोठी रस्सीखेच असणार आहे. हे दोघेही यंदाच्या हंगामात सलामीला येत कशी कामगिरी करतात यावर रोहितचा वर्ल्डकपमधील जोडीदार ठरेल.
अनुभवी भुवी की युवा चहर; ऑस्ट्रेलियाच्या विमानात कोण चढणार? (Bhuvneshwar Kumar Or Deepak Chahar) | भारताकडे जसप्रीत बमुराह, मोहम्मद शमी यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. मात्र त्यांच्या जोडीला ऑस्ट्रेलियात एक चांगला स्विंग गोलंदाज देखील संघात असणे गरजेचे आहे. याबाबतीत सध्या दोन गोलंदाजांमध्ये स्पर्धा आहे. भुवनेश्वर कुमार हा गेल्या काही वर्षापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळत आहे. मात्र त्याच्या दुखापतीमुळे आणि फॉर्ममुळे देखील त्याच्या डोक्यावर संघातून डच्चू मिळण्याची टांगती तलवार लटकत आहे. दुसरीकडे युवा दीपक चहरने आपली गुणवत्ता आयपीएल तसेच भारताकडून खेळतानाही सिद्ध करून दाखवली आहे. दीपक चहरने गेल्या काही सामन्यात बॅटने देखील आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. मात्र दुखापतीमुळे तो आयपीएलचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. इथेच भुवनेश्वर कुमारला आपली दावेदारी पुन्हा गडद करण्याची संधी आहे. या दोघांच्या भांडणात शार्दुल ठाकूर देखील आपला डाव साधण्यास उत्सुक असेल.
यंदाची आयपीएल फिरकीचं कोडं सोडवणार? (Spin Combination) | भारत ही फिरकीपटूंची खाण आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे फिरकीचे भरपूर ऑप्शन आहेत. मात्र कधी कधी खूप सारे ऑप्शन असेल तर डोकेदुखी अधिकच वाढते. तसेच काहीसे भारतीय टी 20 संघाच्या बाबतीत झाले आहे. भारत मनगटी फिरकीपटूंवर भर देणार की ऑर्थोडोक्स फिरकीपटूंचं पारडं जड होणार हा प्रश्न आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाताना किती फिरकी अष्टपैलू खेळाडू घेऊन जायचे याचाही विचार टीम इंडियाला करावा लागणार आहे. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी अश्विन, जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्यात तगडी फाईट असणार आहे. तर दीपक हुड्डा देखील आपली दावेदारी सादर करून या सर्वांमधील स्पर्धा अधिक वाढवू शकतो. यंदाच्या आयपीएलमध्ये टीम इंडिया कोणत्या फिरकी कॉम्बिनेशनने उतरणार हे स्पष्ट होईल.
काय असेल भारताचा फायर पॉवर? (Rishabh Pant Partner For Fire Power) | भारताकडे ऋषभ पंत नामक एक अशी फायर पॉवर आहे की जी एकाट्याच्या जीवावर सामना जिंकून देऊ शकते. मात्र भारताला जर ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर भारताकडे ऋषभ पंतच्या जोडीला अजून एक धाकड फलंदाज पाहिजे जो पंतसारखीच क्षमता ठेवतो. कारण टी 20 च्या जगतात असा मसल पॉवरच्या जोरावर 150 ते 200 च्या सरासरीने धावा करणारा फलंदाज हा महत्वाचा फॅक्टर ठरतो. भारतासाठी आधी ही भुमिका हार्दिक पांड्या बजावत होता. मात्र त्याचा सध्याचा फॉर्म आणि दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्याकडे संघात परतण्याची शेवटची संधी असणार आहे. दुसरीकडे दीपक हुड्डा हा देखील याच श्रेणीत आपली दावेदारी सादर करत आहे. त्याच्या जोडीला व्यंकटेश अय्यर देखील असणार आहे. याचबरोबर शाहरूख खानचा देखील या स्पॉटसाठी विचार होऊ शकतो.
स्लॉग ओव्हरमध्ये बुमराहचा भार कोण करणार हलका? (Slog Over Combination) | भारतीय टी 20 संघात जसप्रीत बुमराहचा रोल हा सुरूवातीच्या पॉवर प्लेमध्ये भारताला ब्रेक थ्रू मिळवून देणे आणि स्लॉग ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजाला वेसण घालणे हा आहे. मात्र स्लॉग ओव्हरमधील दोन षटकांचा प्रश्न बुमराह सोडवू शकतो मात्र उरलेली दोन षटके कोण टाकणार हा यक्ष प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. यासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये मोहम्मद शामी आणि हर्षल पटेल यांच्यात स्पर्धा असणार आहे. हर्षल पटेलला यंदाच्या हंगामात आपली स्लॉग ओव्हरमधील जादू पुन्हा दाखवावी लागणार आहे. नाही तर त्याची जागा दुसराच कोणी तरी घेऊन जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT