These bollyewood Celebrities had to take a long break from movies
These bollyewood Celebrities had to take a long break from movies esakal
फोटोग्राफी

का घेतला होता या कलाकारांनी चित्रपटातून मोठा ब्रेक ? कारण..

सकाळ ऑनलाईन टीम

चित्रपट सिनेमाघरांत बघताना जितके आपल्याला आवडतात,तितकीच त्यामागे एका कलाकाराची आणि पडद्यामागील अनेकांची मेहनत असते.ज्या अॅक्शन मूवीज बघण्यासाठी थिएटरबाहेर एवढी गर्दी जमली असते त्यांतील अॅक्शन रोल करताना कधी कधी अभिनेत्यांना अनेक दुखापतींना सोमोरे जावे लागते.अनेकदा या दुखापती एवढ्या मोठ्या असतात की कलाकारांना चित्रपटांतून मोठा ब्रेक घ्यावा लागतो.अशाच काही बॉलीवुड कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जगप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हीला तीच्या 'खाकी' चित्रपटाच्या वेळी तीच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली होती.शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा जीप चालवताना ताबा सुटला आणि जोरदार धडकेत दहा टाके लावण्याची पाळी आली होती.त्यावेळी अभिनेत्रीचे सासरे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार सेटवर होते.ऐश्वर्याला लगेच प्रायवेट हेलिकॉप्टरने त्यावेळी मुंबईला हलवण्यात आले होते.
बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणाऱ्या 'वाँटेड' चित्रपटाच्या वेळी सलमान खानच्या खांद्याला दुखापत झाली होती.सलमान खानला अनेक चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे.अनेकदा डॉक्टरने दिलेले सल्ले धुडकावून सलमान स्टंटबाजी करतो.या अभिनेत्याला 'दबंग' चित्रपटाच्यावेळी देखिल दुखापत झाली होती.
'बाजीराव मस्तानी' चित्रपटाच्या वेळी चार पानांचा एकपात्री प्रयोग करताना प्रियंकाचं डोकं अक्षरशा चक्रावले होते.तसेच कॅमेरा तीच्याकडे फिरण्याआधीच ती सेटवर बेशुद्ध पडली होती.त्यावेळी शूटिंगमधे सहा तासाचा ब्रेक घ्यावा लागला होता.प्रियंकाला एवढा अशक्तपणा आला होता की तीला डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितले.
'धोनी' या चित्रपटाच्यावेळी सुषांतने केलेली मेहनत चित्रपटातून दिसून येते.सुषांतच्या जाण्याने अक्ख्या बॉलीवुडला धक्का बसला होता.हा चित्रपट करताना सुषांतला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढले तीन आठवडे शूट करता आलं नव्हतं.
वरूण धवन या चार्मिंग हिरोलाही त्याच्या 'ढिशूम' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी दुखापत झाली होती.वरूण तीन दिवसाच्या रेस्टनंतर लगेच सेटवर परतला होता.त्याने डॉक्टरचा सल्ला न मानता परत ४० दिवसांचं शूटिंग शेड्युल पार पाडलं.
सर्वत्र चर्चेत असणाऱ्या कंगनालाही 'मणिकर्णिकेच्या' सेटवर दुखापत झाली होती.स्टंट करताना तीचा स्टंट चुकला आणि तीला ही दुखापत झाली.
'लुधियाना' या चित्रपटाच्या वेळी ४० दिवसांचा शूटिंग शेड्युल फिक्स झालेला असताना आमीर खानला या शूटिंग दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे शूटिंग थांबवावे लागले होते.शूटिंगमधे आमीरला वेगवेगळ्या अँगलने स्टंट करायचे होते.त्यात त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला उभे राहणेही अशक्य झाले होते.जेव्हा त्याला उपचारासाठी नेण्यात आले तेव्हा कळले की त्याच्या खांद्याला मोठी दुखापत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT