couple arguments Esakal
फोटोग्राफी

नवरा-बायकोमधील किरकोळ वादाला गांभीर्यानं घेऊ नका; होऊ शकतात पाच फायदे

छोट्या मतभेदांचे रूपांतर मोठ्या भांडणात होणार नाहीत याची खूप काळजी घ्या

सकाळ डिजिटल टीम

लग्न (Marriage) झाल्यावर सुरूवातीला सगळंच छान वाटतं. नवरा-बायकोला (Husband-Wife) एकमेकांशी वाद घालण्याचे प्रसंगही फारसे येत नाहीत. एकमेकांच्या प्रेमात ते आकंठ बुडालेले असतात. पण जसे दिवस जातात,तसे एकमेकांच्या गोष्टी खटकायला लागतात. एकमेकांची लाइफस्टाइल (Lifestyle)शेअर होते. त्यात बदल करावे लागतात. काही युक्तीवाद सुरूवातीला पटतात. पण मग ते कंटाळवाणे वाटतात. मग कधीतरी भांडणं, किरकोळ वाद सुरू होतात. मात्र ते वाद तुम्ही कशाप्रकारे घेता यावर तुमचे बंध अवलंबून असतात. तुमच्यात जर किरकोळ भांडणे होत असतील तर त्याचा जास्त ताण घेऊ नका. कारण ही भांडणे कदाचित तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. ती कशी त्याची पाच कारणे आहेत. (Benefits of Small Arguments Between Couples)

एकमेकांची मत लपवू नका (Opinions aren’t hidden)- तुम्ही मनात राग धरून राहिलात तर त्याचा त्रास तुम्हाला होईल. त्यापेक्षा जोडीदारासमोर जेव्हा मोठ्याने बोलता तेव्हा तुमचे नाते मजबूत होते. कारण तुम्ही तुमच्यातले मतभेद लपवत नाहीत. तुम्हाला काय वाटते ते स्पष्टपणे मांडता. एकमेकांचा तुम्ही द्वेष करत नाही. उलट तुमचे म्हणणे आणि मत स्पष्टपणे मांडल्याने तुमचे नाते पारदर्शक होते.
जवळीक (Intimacy) एकमेकांशी वाद घातल्याने तुमच्यातली जवळीक आणखी वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. तुम्ही एकमेकांची माफी मागता, चुका दुरूस्त करता, या गोष्टी तुम्हा दोघांना जवळ आणतात.
विश्वासात वाढ (Trust building)-जेव्हा आपण काही गोष्टींवर चर्चा करतो, थोडासा वाद घालतो, तेव्हा तुम्ही एकमेकांपासून काही राखून ठेवत नाही. त्यामुळे तुमच्यातला विश्वास कायम राहतो. नातेसंबंधात कोणतेही वादविवाद नसतील तर तेथे अनेक रहस्ये असू शकतात. अशावेळी पार्टनर्स एकमेकांवर संशय घेतात. त्यामुळेच दोघांनी एकमेकांचे मत ऐकले पाहिजे. नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते.
एकमेकांमुळे बरं वाटतं (It feels better) - मनात जे आहे ते आपण बोलतो तेव्हा ते पार्टनरसोबत बोलून तुम्हाला बरे वाटू लागते. जरी तुम्ही दोघांनी वाद घातला तरी शेवटी भडास काढून आणखी चांगले आणि आरामशीर वाटते. निरोगी वादविवाद नेहमीच चांगले असतात. म्हणून झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या समस्यांचे निराकरण केल्याची खात्री करा.
सुधारण्यावर भर (Character Improvement)- काही काळ भांडण आणि वाद झाले तर अश्याने जोडीदारासाठी तुमचा संयम वाढतो. उलट यामुळे एकमेकांवरील काळजी आणि प्रेम कालांतराने वाढते. अनावश्‍यक वाद टाळण्यासाठी अनेक जण समोरच्याच्या कलाने स्वतःला जुळवून घेतात. पण, असे किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होणार नाहीत याची खूप काळजी घ्या. मर्यादा अजिबात ओलांडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT