Winter  esakal
फोटोग्राफी

हिवाळ्यात राहायचंय उबदार! हे पाच पदार्थ खा

हिवाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यातील गारव्यापासून रक्षण मिळविण्यासाठी अनेकजण स्वेटर वापरतात. तर त्वचेचे रक्षण करण्यासाठी क्रीम (Cream) वगैरे लावून फिट ठेवायचा प्रयत्न केला जातो. पण थंडीत मिळणारे काही पदार्थ (Winter Food) खाल्ल्याने तुम्ही आतून उबदार राहता. त्यामुळे तुम्हाला थंडी वाजणार नाही. जर थंडी वाजलीच तर ती बाधणार नाही. कारण हे पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.

आलं(Ginger)- आलं उष्ण असतं. अनेकजण चहात आलं हमखास वापरतात. पण जर तुम्हाला थंडीमुळे घशात खवखव, खोकला, सर्दी होण्याची समस्या असेल तर आलं खाल्याने फायदा होईल.
हळद(Turmeric) - ओली हळद किंवा हळदीचा वापर आरोग्यासाठी अत्यंत चांगला असतो. हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच. पण, अनेक रोगांपासून, इफ्के्शनपासून बचाव करते. सर्दी, खोकला झाला असेल तर हळदीचे दूध प्यायल्याने आराम मिळतो.
कांदा(Onion) - कांदा हिवाळ्यात तुमच्या शरीराचे तापमान वाढवतो. अधिक कांदा खाल्ला तर शरीरातून घाम येतो. तसेच आरोग्यालाही तो फायदा करतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात कांदा खूप खावा.
ड्रायफ्रूट्स(Dry fruits)- बदाम, खजूर, मनुके हा सुकामेवा खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते. यात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, झिंक, कॅल्शिअम असे भरपूर घटक असतात. जे आरोग्यासाठी फायद्याचे आहेत.
हिरवी मिर्ची (Green green chilli )- तिखट हिरवी मिर्ची खाल्ल्याने अंगात उष्णता निर्माण होते. मिर्चिचा तिखटपणा शरीराचे तापमान वाढवतो. त्यामुळे आतून गरम वाटतं. थंडी दूर करून उष्णता मिळविण्यासाठी तुम्ही हिरवी मिरची नक्की खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

SCROLL FOR NEXT